Agriculture news in Marathi Swabhimani Sanghatana's all night vigil in Satara | Agrowon

साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर जागर आंदोलन

टीम अॅग्रोवन
शनिवार, 5 डिसेंबर 2020

कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना येथील शेतकऱ्यांनी आठवडाभरापासून दिल्ली येथे आंदोलन सुरू केले आहे, तरीही केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता. ३) रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर भजन, कीर्तन करत जागर आंदोलन केले.

सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना येथील शेतकऱ्यांनी आठवडाभरापासून दिल्ली येथे आंदोलन सुरू केले आहे, तरीही केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता. ३) रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर भजन, कीर्तन करत जागर आंदोलन केले.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुन साळुंखे, रमेश पिसाळ, संजय जाधव, जनार्दन आवारे, हणमंत जाधव, संदीप पाटील, मनोज जाधव, सुनील जाधव, माणिक चव्हाण, महादेव डोंगरे, हिंदूराव शेळके, दादा फडतरे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. शेळके म्हणाले, की केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मंजूर केले आहेत. हे कायदे शेतकरी विरोधी असल्याने पंजाब, हरियाना व इतर काही राज्यांतील शेतकरी केंद्र सरकार विरोधात रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या सुरू केला आहे.

 या आंदोलक शेतकऱ्यांसोबत महाराष्ट्रातील शेतकरी असल्याने केंद्र सरकारच्या विरोधात स्वाभिमानी संघटनेच्या वतीने राज्यभर जागर आंदोलन करण्यात आले. पुढील दोन दिवसांत केंद्र सरकारने निर्णय घेतला नाही, तर राज्यातही टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देण्यात आला.


इतर ताज्या घडामोडी
ट्रक वाहतूकदारांचे दोन हजार कोटींचे...अमरावती : नवीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीत...
गोरेवाडा प्राणिसंग्रहालय नामकरणाला विरोधनागपूर ः नागपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या...
औरंगाबाद विभागात उसाचे ४७ लाख टन गाळपऔरंगाबाद : येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर)...
वीज तोडल्यास गाठ आमच्याशी : कृती समितीकोल्हापूर ः कोरोना काळातील वीजबिले माफ करण्याची...
बीटी कापूस बियाण्यातील शेतकऱ्यांची...बुलडाणा ः कापूस उत्पादकांना कमी खर्चात अधिक...
अण्णांचे दिल्लीऐवजी राळेगणसिद्धीत आंदोलननगर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नवी...
राज्यात मेथी २५० ते ३००० रुपये शेकडासोलापुरात प्रतिशेकडा ३०० ते ७०० रुपये सोलापूर...
उत्पादनवाढीसाठी योग्य तंत्रज्ञान वापरा...सोलापूर ः हरभरा, तूर या कडधान्य पिकाखालील...
गावठाण भूमापन कामाचे ड्रोनद्वारे...नांदेड : ‘‘भूमी अभिलेख विभाग व भारतीय सर्वेक्षण...
जमिनींचा लिलाव रोखा ; शेतकरी संघटनेची...नाशिक : शेतकऱ्यांचे चोहोबाजूंनी नुकसान झाले आहे....
सातारा जिल्ह्याची वीजबिल थकबाकी ४४...नगर ः खरीप हंगामात तयार झालेल्या तुरीला बाजारात...
शाश्‍वत उत्पन्नासाठी वनशेतीचे नियोजनवनशेतीपासून अन्नधान्याबरोबरच वृक्षापासून चारा,...
प्रशिक्षण, निविष्ठा विक्रीसाठी योजनामहाराष्ट्र सहकारविकास महामंडळामार्फत शेतकरी...
असे करा कोबीवर्गीय पिकांतील किडींचे...कोबीवर्गीय भाजीपाला पानकोबी व फुलकोबीवर मावा,...
शेतकरी नियोजन- पीक - डाळिंबशेतकरी- ः ज्ञानेश्‍वर वाघमोडे गाव ः चळे, ता....
शेतकरी नियोजन पीक ः केळीशेतकरी - प्रेमानंद हरी महाजन, तांदलवाडी, ता....
नाशिक बाजारात कारल्याचे दर टिकूननाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात हरभरा आला कापणीलाजळगाव ः जिल्ह्यात रब्बीची पेरणी २००...
प्रदर्शनातील कृषी ज्ञानाचा खजाना पाहून...माळेगाव, जि. पुणे ः कृषिक २०२१- कृषी तंत्रज्ञान...
पुणे विभागात उसाच्या ५५ टक्के लागवडीपुणे ः यंदा पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे...