शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या: स्वाभिमानी शेतकरी संघटना

स्वाभिमानी आंदोलन
स्वाभिमानी आंदोलन

बुलडाणा ः परतीच्या पावसामुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत शासनाने द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी (ता. ३१) येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांना निवेदनही दिले.      यावर्षी परतीच्या पावसाने सोयाबीन, कापूस, मका, ज्वारी, उडीद, मूग, आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु, प्रशासन पंचनाम्याच्या नावाखाली वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत आहे. शेतकऱ्यांना मदतीची अत्यंत आवश्यता आहे. जर शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळाली नाही, तर शेतकरी आत्महत्या वाढू शकतात. शेतकऱ्यांच्या प्रतिप्रशासनाने संवेदनशील राहून तत्काळ शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई बँक खात्यात जमा करावी, शेतकऱ्यांना पीकविम्यासाठी जाचक अटी लावू नये, पीकविमा मंजूर करावा, अशी मागणी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. शासनाने दखल न घेतल्यास ५ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. रविकांत तुपकर, राणा चंदन, प्रशांत डिक्कर, भगवान मोरे, अमोल राऊत, बबनराव चेके, श्याम अवथळे, ज्ञानेश्वर टाले, भारत वाघमारे, संतोष शिंगणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीन, ज्वारी, मक्याचे कुजलेले पीक आणून प्रशासनाला दाखविण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना केले स्थानबद्ध शेतकरी मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ५ नोव्हेंबरपर्यंत तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com