स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक, पाटीलवाडा ठरला दूध आंदोलनाचा केंद्रबिंदू

स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक, पाटीलवाडा ठरला दूध आंदोलनाचा केंद्रबिंदू
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक, पाटीलवाडा ठरला दूध आंदोलनाचा केंद्रबिंदू

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून पोलिसांना चकवा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिलेदारांनी सर्जिकल स्ट्राईक करत किणी टोल नाक्‍यावर महामार्ग रोखून धरला. मोठा पोलिस बंदोबस्त आणि शेकडो अधिकारी असतानाही संघटनेने हे आंदोलन यशस्वी करून दाखवले. आंदोलनात खासदार राजू शेट्टी यांच्या पत्नी संगीता शेट्टी यांनीही भाग घेतला. 

संघटना कार्यकर्त्यांची पोलिसांनी रात्रीपासून धरपकड केली. सकाळीही कोगनोळी टोल नाका, शिरोली नाका, वाठार नाका, कणेगाव, पेठनाका येथे वाहने अडवून कार्यकर्त्यांची धरपकड केली. तरीही पोलिसांना चकवा देत किणी गावातील पाटील वाड्यावर कार्यकर्त्यांनी धडक दिली. तोपर्यंत टोल नाक्‍यावर येणाऱ्या एक, दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडून वाहनात घातले. कार्यकर्त्यांना अडवले असल्याने आंदोलन संपले असा समज पोलिसांनी काहीकाळ करून घेतला होता. त्याचवेळी पाटील वाड्यावर शेकडो कार्यकर्त्यांची रिघ लागली होती. कार्यकर्ते आक्रमक होऊन टोल नाक्‍यावर चाल करण्याची भाषा करत होते. मात्र संघटनेचे नेते सावकार मादनाईक, भगवान काटे, स्वस्तिक पाटील यांनी कार्यकर्त्यांची समजूत घातली. 

दुपारी सव्वा वाजता पाटील वाड्यावरून कार्यकर्त्यांचा संयम संपला आणि हा कार्यकर्त्यांचा लोंढा महामार्गावर दाखल झाला. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणा देत जोरदार आंदोलन केले. तसेच हा ट्रेलर असून गरज पडल्यास पिक्‍चर दाखवायचं तयारीही असल्याचे सांगून या मोर्चाची सांगता करण्यात आली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com