दोन रुपये अनुदानाचा निर्णय हास्यास्पद : बांगर

दोन रुपये अनुदानाचा निर्णय हास्यास्पद : बांगर
दोन रुपये अनुदानाचा निर्णय हास्यास्पद : बांगर

मंचर, जि. पुणे : ‘‘राज्य सरकारने कांद्याला प्रती किलो दोन रुपये अनुदान देण्याचा घेतलेला निर्णय हास्यास्पद आहे. त्यातून शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च भागणार नाही. कांदा उत्पादक व शेतकऱ्याना देशोधडी लावण्याच्या पापात भारतीय जनता पक्षाप्रमाणे शिवसेनाचाही सहभाग आहे,’’ अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केली.  मंचर (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. २०) पुणे-नाशिक रस्त्यावर बांगर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन केले. या वेळी राज्य शासनाने प्रती किलोला दोन रुपये अनुदान देण्याच्या निर्णयाचा संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रत्यावर कांदा फेकून निषेध केला.       'प्रती क्विंटल एक हजार रुपये अनुदान कांद्याला मिळाले पाहिजे. कांद्याचा प्रश्न निवारण न झाल्यास मंत्र्यांना कांदा फेक आंदोलनाला सामोरे जावे लागेल,' असा इशारा बांगर यांनी दिला. बाजार समितीपासून भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागाचे गजानन पाटील, काळूराम कड, जयप्रकाश परदेशी, यशवंत इंदोरे गुरुजी, वनाजी बांगर यांची भाषणे झाली. पंकज पोखरकर यांनी आभार मानले. सभेनंतर पुणे- नाशिक रस्त्यावर बाजार समिती समोर कांदे रस्त्यावर टाकून शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com