agriculture news in marathi, Swabhimani Shetkari Sanghatana 'Sentinel' sent to 'jawans' | Agrowon

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ‘चौकीदारांना’ पाठविल्या शिट्ट्या
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 मार्च 2019

बुलडाणा : देशात विविध घोटाळे, फायली गायब झाल्या असताना सध्या ‘मी चौकीदार’ असा ट्रेंड सुरू आहे. सक्षम चौकीदार असताना दहशतवादी हल्ले कसे झाले, असा प्रश्न उपस्थिती करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या ‘चौकीदारांना’ प्रतीकात्मक शिट्ट्या पाठविल्या आहेत. 

बुलडाणा : देशात विविध घोटाळे, फायली गायब झाल्या असताना सध्या ‘मी चौकीदार’ असा ट्रेंड सुरू आहे. सक्षम चौकीदार असताना दहशतवादी हल्ले कसे झाले, असा प्रश्न उपस्थिती करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या ‘चौकीदारांना’ प्रतीकात्मक शिट्ट्या पाठविल्या आहेत. 

संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांच्या नेतृत्वात बुधवारी (ता.२७) खामगाव येथे टपालाद्वारे शिट्ट्या पाठविण्यात आल्या. निषेधात्मक असलेल्या या प्रकाराबाबत फाटे म्हणाले, की अनेक दिग्गज ‘मी चौकीदार’ असल्याचे म्हणत आहेत. त्यांनी देशाचे किती संरक्षण केले, ते जाहीर करावे. राफेलची फाइल चोरी गेली. कोट्यवधी घेऊन मल्ल्या, नीरव मोदी गायब झाले. देशावर ३०० किलो आरडीएक्स घेऊन दहशदवादी हल्ला झाला. हे रोखण्यास चौकीदार सक्षम नाहीत का, असा प्रश्‍न आहे.

आता तरी देशाचे संरक्षण योग्य करा अशा संदेश देऊन भाजपच्या दिल्ली कार्यालयात शिट्या पाठविण्यात आल्या. जे कुणी देशाचे चौकीदार आहेत, त्यांनी निदान या शिट्या घेऊन काटेकोरपणे देशाचे संरक्षण करावे. शिट्या घेऊनही तुम्ही कर्तव्य बजावत नसाल, तर पुढच्या काळात चौकीदाराचा गणवेश देखील पाठवू , असा इशारा जिल्हाध्यक्ष फाटे यांनी यावेळी दिला.

इतर ताज्या घडामोडी
हमीभाव खरेदी केंद्रावर आली वजनकाटे...अकोला ः शासनाने या हंगामात सुरु केलेल्या आधारभूत...
मराठवाड्यात रब्बी पेरणीला मिळेना गती लातूर : मराठवाड्यातील रब्बी पेरणीची गती...
परभणी जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सद्य:स्थितीत...
अरुणा प्रकल्पग्रस्तांनी मांडले...सिंधुदुर्ग : आयुक्त कार्यालयावर ‘दे धडक बेधडक’...
पाण्याच्या निचऱ्यासाठी गादीवाफ्यावर धान...भंडारा ः‘पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा...
अस्मानीमुळे नुकसान सोसवेना, चालविली...नाशिक : अगदी प्रतिकूल परिस्थितीत भांडवल जमा करून...
अचूक सांख्यिकीमुळे शेती उत्पन्न वाढविणे...नवी दिल्ली: बदलत्या हवामानाच्या आव्हानावर...
पुणे जिल्हा परिषदेत येणार ‘महिला राज’पुणे  : जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष...
पुणे बाजार समितीत रताळ्यांची २० टन आवक...पुणे  ःकार्तिकी एकादशीनिमित्ताने पुणे बाजार...
कशामुळे घटले साताऱ्यातील स्ट्राॅबेरीचे...सातारा  ः जिल्ह्यात अतिपावसाचा फटका...
साताऱ्यात पुढील वर्षी सहकारी संस्थांची...सातारा  : आगामी वर्ष हे सहकारातील विविध...
नगर जिल्हा परिषदेतही वाहताहेत...नगर ः राज्यात एकीकडे भाजपला सत्तेपासून दूर...
थकीत पीकविम्यासाठी किसान सभेचा पुण्यात...पुणे  ः बीडमधील शेतकऱ्यांना थकीत पीकविम्याची...
किसान सभेचे सोमवारपासून राज्यभर आंदोलन...पुणे  ः अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. या...
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे केंद्र...मुंबई  : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यावर...
भारतीय मक्याचे पुढे काय होते ? जाणून...मका हे एक महत्त्वाचे तृणधान्य आहे. जगातील चार...
शाश्‍वत शेतीसाठी तण व्यवस्थापन आवश्यकतणांकडे आजवर आपण सर्वांनी एखाद्या शत्रूसारखे...
नगरमध्ये टोमॅटो ५०० ते २००० रुपये...नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता...
संत नामदेव महाराजांच्या १७ व्या...पंढरपूर : पंढरपूर येथून आळंदीकडे निघालेल्या श्री...
फळपीक सल्लायावर्षी पावसाळी हंगाम अपेक्षेपेक्षा जास्त वाढला....