agriculture news in marathi, swabhimani shetkari sanghatna gives cavet for milk rate, kolhapur, maharashtra | Agrowon

शासन निर्णयाप्रमाणे दर न दिल्यास ‘अमूल’चे दूध रोखण्याचा इशारा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

अमूल दूध संघाने शासन आदेशाचे पालन करून गाईच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपये लिटर दर द्यावा. मागणीकडे दुर्लक्ष केल्यास १ सप्टेंबरपासून ‘अमूल’चे दूध रोखण्यात येईल. ‘स्वाभिमानी’ने दूध दरवाढीसाठी शासनाला नमविले आहे. याचा विचार ‘अमूल’ प्रशासनाने करावा.
- शैलेश चौगुले, स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी.
 

कोल्हापूर  : अमूल दूध संघाकडून गाईच्या दुधाला कमी दर मिळत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उदगाव (ता. शिरोळ) येथील अमूल दूध संघ प्रकल्पावर जाऊन व्यवस्थापनास जाब विचारला. शासन निर्णयानुसार दर न दिल्यास १ सप्टेंबरपासून ‘अमूल’चे दूध रोखण्याचा इशारा बुधवारी (ता. २२) कार्यकर्त्यांनी दिला.

गाईच्या दूध दरवाढीसाठी गेल्या महिन्यात आंदोलन करण्यात आले. यानंतर शासनाने गाईच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर देण्याचा निर्णय घेतला. यानुसार बहुतांश संघांनी शासन निर्णयानुसार दर देण्याचे धोरण अवलंबिले. मात्र अमूल दूध संघाकडून गाईच्या दुधाला प्रतिलिटर २२ रुपये ३५ पैसे दर दिला जात आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी ‘अमूल’च्या उदगाव येथील प्रकल्पावर जाऊन याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र जबाबदार अधिकारी नसल्याने दूरध्वनीवरून चर्चा झाली. प्रकल्पस्थळी चर्चेचा निर्णय झाला.

मात्र अधिकाऱ्यांनी दिवसभर कार्यकर्त्यांना ताटकळत ठेवले. रात्री आठ वाजता अधिकारी प्रकल्पावर आले. या वेळी कार्यकर्त्यांनी त्यांना धारेवर धरले. पंचायत समिती सदस्य मन्सूर मुलाणी, प्रा. राजाराम वरेकर, ऋतुराज सावंत-देसाई, स्वप्निल इंगळे, शंकर नाळे, बाळासो चौगुले, बंडू पाटील, पप्पू मोटके, अभिजित समगे आदी उपस्थित होते.

शासनाकडून अमूल दूध संघाला अनुदान मिळत नाही. त्यामुळे दुधास दर देणे कठीण होत आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रश्‍न मांडू. दूध संघाला अनुदान मागण्याबाबत तत्काळ प्रयत्न करण्यासाठी चर्चा करू, असे अमूल दूध संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावजीभाई चौधरी यांनी सांगितले.
 

इतर अॅग्रो विशेष
संघर्षमय हंगामगेल्या वर्षीच्या गळीत हंगामात राज्यात विक्रमी...
द्राक्ष शेतीला चालना कशी मिळेल?संपूर्ण भारत देशामध्ये द्राक्ष लागवड १.३९ लाख...
जमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदानजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून,...
ईशान्यकडील राज्ये का नाकारतात...कोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने...
जळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली...जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (...
केंद्रीय पथक आज करणार पीकहानीची पाहणीपुणे ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेतीच्या...
‘दाणेदार’ खताच्या मागे ‘मालदार’ हालचालीपुणे : राज्यात १९७० ते २००० या तीन दशकांमध्ये...
योजना, निधीची कमी नाही, मग शेतीचे प्रश्...औरंगाबाद : योजना, निधी, यंत्रणा, सुविधा,...
धक्कादाय ! चक्क दाताखाली दाणे ठेवत...उमरखेड, यवतमाळ : मॉन्सूनोत्तर पावसाच्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात गारठा कमीपुणे: विदर्भ, मराठवाड्यात तापमान कमी झाल्याने...
शेतकऱ्यांचे ३० कोटी परत करा; पुण्यात...पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंब...
फूलशेती देऊ शकते का उत्पन्नाचा हमखास...अकोला जिल्ह्यातील कंझरा येथील अमृतराव दलपतराव...
पुदिना उत्पादनात रवी करंजकरांची मास्टरी...मुंबईत पुदिन्यात ‘गुडवील’ मिळविलेले करंजकर नाशिक...
अचूक आकडेवारीचा काळ आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत...
उद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच !मुंबई / पुणे  ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे   : किमान तापमानात घट होत असल्याने...
खतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...
भरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...
बॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....
भूगर्भ तहानलेलाच!रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...