agriculture news in marathi, swabhimani shetkari sanghatna will do agitation, buldhana, maharashtra | Agrowon

`स्वाभिमानी`चे सोमवारी राज्यात चक्का जाम आंदोलन ः देवेंद्र भुयार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

बुलडाणा  ः राज्यात या वर्षी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याच्या कोणत्याच भागातील शेतकऱ्यांच्या घरात या वर्षी उत्पन्न आलेले नाही. अशावेळी शासन व प्रशासनाने शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना, राजकीय व्यवस्था सत्ता स्थापनेच्या गोंधळात, तर प्रशासन आदेशाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (ता. ११) राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.

बुलडाणा  ः राज्यात या वर्षी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याच्या कोणत्याच भागातील शेतकऱ्यांच्या घरात या वर्षी उत्पन्न आलेले नाही. अशावेळी शासन व प्रशासनाने शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना, राजकीय व्यवस्था सत्ता स्थापनेच्या गोंधळात, तर प्रशासन आदेशाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (ता. ११) राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.

विदर्भातील ‘स्वाभिमानी’चे आमदार देवेंद्र भुयार यांनी मंगळवारी बुलडाण्यात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी रविकांत तुपकर, राणा चंदन उपस्थित होते. आमदार भुयार म्हणाले, की कॉर्पोरेट कंपन्यांचे कर्ज जसे मोठ्या मनाने माफ केले जाते, त्याच पद्धतीने आता सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांना भरघोस मदत देणे आवश्यक आहे. पीकविम्यासाठी कंपन्यांनी स्वतंत्रपणे सर्व्हे न करता महसूल आणि कृषी विभागाने केलेले पंचनामे अंतिम मानून नुकसानभरपाई देण्याची गरज आहे.

नुकसानभरपाईच्या अटींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली दहा हजार कोटींची मदत तुटपुंजी आहे, त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीदेखील श्री. भुयार यांनी या वेळी केली. यावेळी  रविकांत तुपकर, आमदार भुयार यांनी सावळा, भादोला, वरवंड, डोंगर खंडाळा या भागात नुकसानीची पाहणी करून शेकऱ्यांनी संवाद साधला.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात गव्हात बियाणे बदलाचे...नगर : रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांत...
किमान तापमानात घट; विदर्भात थंडीत वाढमहाराष्ट्रावरील हवेचा दाब वाढत आहे. या आठवडाच्या...
परभणीत वाटाण्याला ४००० ते ६००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
पोटदुखीवर नाडुकली उपयुक्त स्थानिक नाव     ः  ...
लोक-जैविपा - भर दुष्काळात उभारलेली...शेतकऱ्यांचा पुढाकार अनुभवल्यावर वन विभागाच्या...
नगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस...नगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या...
'या' बाजार समितीत शेतकऱ्यांना अल्प दरात...अकोला : सध्या कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा...
जळगाव जिल्ह्यात सर्वच नुकसानग्रस्तांना...जळगाव : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना...
केंद्रीय पथक आज मराठवाड्यात पीक...औरंगाबाद : मराठवाड्यात ऑक्‍टोबर-...
फळबागांची लागवड खोळंबण्यास ‘तो’ ठरला...पुणे : मागील दोन ते तीन महिन्यांत जोरदार पाऊस...
सांगलीत बेदाणा लिलावास प्रारंभसांगली : दिवाळीच्या महिन्याच्या सुटीनंतर बाजार...
अमरावती जिल्ह्याला २४ टक्‍के...अमरावती : मॉन्सूनोत्तर पावसाचा जिल्ह्यात ८० टक्‍...
परभणी विभागात २८ हजार क्विंटल...परभणी : महाबीजच्या परभणी विभागातील सहा...
हमीभावासाठी 'सीसीआय'ला द्या कापूस : ॲड...वर्धा : ‘‘शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी...
राज्यात रताळी ५०० ते ६००० हजार रुपये...जळगावात २२०० ते ३२०० रुपये  जळगाव...
पेरणीपूर्व मशागतीय पद्धतीने करा...रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई व सूर्यफूल...
कांदा पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य...कांदा उत्पादकता कमी होण्यासाठी असंतुलित खत...
जळगाव जिल्हा परिषदेत निधीवाटपावरून आरोप...जळगाव : जिल्हा परिषद सेस फंड, शिक्षण, महिला-...
वऱ्हाडला पीक नुकसानभरपाईचा २६५ कोटींचा...अकोला : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसाचा फटका...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख टन खते...पुणे : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांची अडचण येऊ...