agriculture news in marathi, swabhimani shetkari sanghtna did agitation for to cancel rcep contract, mumbai, maharashtra | Agrowon

‘आरसीईपी’ करार रद्द करण्याच्या मागणीसाठी `स्वाभिमानी`चे आंदोलन
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

केंद्र सरकारने हा करार रद्द केला नाही, तर आजपासून संपूर्ण देशात अखिल भारतीय संघर्ष समन्वय समितीच्यावतीने २०० हून अधिक संघटना एकत्र येऊन आंदोलन सुरू करणार आहेत.
- राजू शेट्टी

मुंबई ः प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (आरसीईपी) योजनेत वस्त्रोद्योग, शेती व दुग्ध व्यवसायाचा समावेश झाल्याने देशातील वस्त्रोउद्योग, शेतकरी आणि दुग्ध उत्पादक कोलमडणार असून हा करार रद्द करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी, आमदार देवेंद्र भुयार, माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. ४) मंत्रालयासमोर दूध, दही, दुग्धजन्य पदार्थ, डाळी, सोयाबीनसह विविध शेतीमाल फेकून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बँकाॅकमध्ये ‘आरसीईपी’ करारावर स्वाक्षरी करणार आहेत. ‘आरसीईपी’मधून आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशांशी करार करून आयात- निर्यातीचे धोरण ठरविण्यात येणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर १६ देशांतून शून्य टक्के आयातशुल्क आकारून अनेक वस्तू भारतात येणार आहेत. यामध्ये भारत सरकार दुग्ध व्यवसायासंदर्भात न्यूझीलंड व ॲास्ट्रेलिया या देशांशी उपपदार्थाबाबत करार करणार आहे. वस्त्रोद्योगाबाबत चीन व बांगलादेश, आॅटोमोबाईल क्षेत्राबाबत जपानशी करार केला जात आहे.

सध्या जागतिक स्तरावर भारत हा दुग्ध व त्याच्या उपपदार्थ उत्पादनात आघाडीवर आहे. जर न्यूझीलंड व ॲास्ट्रेलियामधून उपपदार्थ आयात होऊ लागले, तर देशातील दुग्धव्यवसाय कोलमडून जाईल. देशामध्ये जवळपास १० कोटी दुग्ध उत्पादक शेतकरी संकटात येऊन बेरोजगारी वाढेल. त्याबरोबर वस्त्रोद्योग क्षेत्रात नोटाबंदी व जीएसटी निर्णयामुळे मंदी निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे. अशावेळी हा करार झाला तर संपूर्ण देशातील शेती, वस्त्रोद्योग, डेअरी व आॅटोमोबाईल क्षेत्र अडचणीत येऊन बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. देशामध्ये शेतीनंतर वस्त्रोद्योग व डेअरी हे दोन व्यवसाय सर्वाधिक रोजगार देणारे असून, या करारामुळे या क्षेत्रात मंदी येऊन देशासमोर मोठे संकट निर्माण होणार आहे. 
 

इतर ताज्या घडामोडी
संत नामदेव महाराजांच्या १७ व्या...पंढरपूर : पंढरपूर येथून आळंदीकडे निघालेल्या श्री...
फळपीक सल्लायावर्षी पावसाळी हंगाम अपेक्षेपेक्षा जास्त वाढला....
कळमणा बाजारात सोयाबीन दरात घसरणनागपूर : गेल्या आठवड्यात सुधारलेल्या सोयाबीनच्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीला १३०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणस ध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
सोयाबीन, मका, गव्हाचे दर स्थिर; बाजरीत...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
शिशुआहारातील शर्करेविषयी अधिक काळजी...माणसाच्या आरोग्याला हानिकारक खाद्यविषयक सवयी...
वऱ्हाडात जमिनीतील ओलीमुळे रब्बीची पेरणी...अकोला : मॉन्सूनोत्तर पावसाने मोठा...
'गडचिरोली जिल्ह्यात शासकीय धान खरेदी...गडचिरोली  ः आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने...
खानदेशात प्रकल्पांमधील साठा ७८ टक्‍क्‍...जळगाव  ः खानदेशात सर्वच भागांतील...
भामरागड तालुक्‍यातील पूरग्रस्त...गडचिरोली  ः उपविभागीय अधिकारी कार्यालय...
कापूस खरेदीसाठी आर्द्रतेची मर्यादा...वर्धा  ः संततधार पावसामुळे या वर्षी कापसात...
'शासकीय धान केंद्रावर जाचक अटींचे...भंडारा  ः शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड...
अमरावती विभागात विषबाधितांची संख्या...अमरावती ः राज्यात दोन वर्षांपूर्वी फवारणीदरम्यान...
देवळाली कॅम्प येथून ४८ हजार रुपयांच्या...नाशिक : नाशिक तालुक्यातील देवळाली कॅम्प येथील...
डाळिंब बागा वाचविण्यासाठी धडपडआटपाडी, जि. सांगली :  यंदा तालुक्यात रिमझिम...
सांगली जिल्ह्यात रब्बीतील पिकांची ६७...सांगली : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख क्विंटल...पुणे  ः यंदा पाऊस उशिरा झाल्याने पुणे...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीवर अमेरिकन...परभणी : जिल्ह्यातील पेडगाव (ता. परभणी) येथील दोन...
सोलापूर जिल्ह्यात रब्बीची उरकली ३१...सोलापूर : खरिपामध्ये पावसाने हुलकावणी दिली. पण,...