‘स्वाभिमानी’ला विधानपरिषदेची जागा देऊन आघाडी धर्म पाळावा 

नाशिक : लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला विधानपरिषदेची जागा देऊ, असा शब्द काँग्रेस-राष्ट्रवादीने दिला होता. दिलेला शब्द व आघाडी धर्म पाळावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केली आहे.
Swabhimani should be given a seat in the Legislative Council
Swabhimani should be given a seat in the Legislative Council

नाशिक : लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला विधानपरिषदेची जागा देऊ, असा शब्द काँग्रेस-राष्ट्रवादीने दिला होता. दिलेला शब्द व आघाडी धर्म पाळावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केली आहे. 

याबाबत श्री. जगताप यांनी सांगितले की, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे एनडीएतून बाहेर पडणारे देशातील राजू शेट्टी हे देशातील पहिले नेते होते. देशभर दोनशेपेक्षा जास्त शेतकरी संघटना एकत्र करून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला. भाजपविरुद्ध जनमत तयार केले. लोकसभेच्या व नंतर विधानसभेच्या निवडणुकीत स्वतः राजू शेट्टी व स्वाभिमानीचे कार्यकर्ते आघाडीसोबत प्रचारात उतरले. भाजपविरुद्ध शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर रान पेटवले. त्यामुळे सत्तेपासून फडणवीस सरकार दूर राहायला मदत झाल्याचे त्यांनी सांगितले. 

लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी जागा वाटपात व्यापक शेतकरी हित लक्षात घेऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी अनेक हक्काच्या जागांवर मतविभाजन टाळण्यासाठी पाणी सोडले. त्याचा फायदा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना झाला. ठाकरे सरकार सत्तेत आल्यावर राजू शेट्टींसारखा कृषिमंत्री असावा ही जनतेची भावना होती. पण त्याकडे आघाडीने दुर्लक्ष केले. सत्तेत संघटनेला हक्काचा वाटा दिला नाही. किमान आता दिलेल्या शब्दाप्रमाणे विधानपरिषदेची जागा स्वाभिमानीला द्यावी,आघाडीचा धर्म पाळावा, अशी महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांची व शेतकऱ्यांची इच्छा आहे, असे श्री. जगताप यांनी म्हटले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com