Agriculture news in Marathi 'Swabhimani' starts fasting for milk promotion | Agrowon

दूधदरवाढीसाठी ‘स्वाभिमानी’चे परभणीत उपोषण सुरू

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 जानेवारी 2020

परभणी ः मराठवाड्यात शासकीय दूध योजनेअंतर्गंत खरेदी केल्या जाणाऱ्या दूध दर तसेच वाहतूक खर्च, कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी. खरीप पीकविमा परतावा देण्यात यावा, आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शुक्रवारी (ता. २४) बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले.

परभणी ः मराठवाड्यात शासकीय दूध योजनेअंतर्गंत खरेदी केल्या जाणाऱ्या दूध दर तसेच वाहतूक खर्च, कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी. खरीप पीकविमा परतावा देण्यात यावा, आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शुक्रवारी (ता. २४) बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले.

गेल्या वर्षीच्या दुष्काळी स्थितीत शासनाने दूध दरात दोन रुपयांनी कपात केल्यामुळे दुधाचे दर प्रतिलिटर २७ रुपयांवरून २५ रुपये करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दूधदर समान करण्यात आले. परंतु, दोन महिन्यांनंतर पश्चिम महाराष्ट्रातील दुधाचे दर प्रतिलिटर ३२ रुपये करण्यात आले. परंतु, मराठवाड्यातील दूध उत्पादकांना अजूनही शासकीय दुग्ध शाळेत २५ रुपये लिटरने दूध घालावे लागत आहे. 

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दूधदरातील तफावत दूर करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील दूध उत्पादकांना ३२ रुपये प्रतिलिटरप्रमाणे दर देण्यात यावा. त्याचप्रमाणे अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीकविमा भरपाईचे वाटप तत्काळ करण्यात यावे. या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखाली डिगांबर पवार, भास्कर खटींग, रामप्रसाद गमे, दीपक गरुड, माऊली बोकारे आदींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...