agriculture news in marathi Swabhimanis agitation will starts from 17th says Raju Shetty | Agrowon

‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाची १७ ला सुरुवात : राजू शेट्टी 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021

गुरुवारी (ता.१७) रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात नागपुरात धरणे आंदोलनाने होत आहे, अशी घोषणा संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. 

बुलडाणा : कापूस-सोयाबीन उत्पादकांचे प्रश्‍न, अतिवृष्टिग्रस्तांनी पीकविमा, नुकसानभरपाई आदी प्रश्‍नांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले आहे. आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र होणार असून, याची सुरुवात गुरुवारी (ता.१७) रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात नागपुरात धरणे आंदोलनाने होत आहे, अशी घोषणा संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. 

जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. या वेळी संघटनेचे नेते रविकांत तुपकर उपस्थित होते. श्री. शेट्टी म्हणाले, की सोयाबीन पेंडीची आयात थांबवा, पाम तेलावरचा आयात कर पूर्वीसारखा २० टक्के करा, किरकोळ व्यापाऱ्यांवर लादलेली स्टॉक लिमिट उठवा, विमा कंपन्यांनी कराराप्रमाणे सरासरीपेक्षा २५ टक्के पाऊस जास्त झालेल्या जिल्ह्यात सरसकट मदत द्यावी, कापणीपश्‍चात तारखेचा घोळ न घालता कृषी विभाग सांगते त्या पद्धतीने पीकविम्याचे क्लेम मंजूर करा, राज्याने जाहीर केलेली १० हजारांची नुकसान भरपाईची मदत एकरकमी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे. 

याची सुरुवात बुधवारी (ता.१ ७) नागपुरात रविकांत तुपकर संविधान चौकात बेमुदत धरणे आंदोलनाने करतील. गुरुवारी (ता.१८) प्रत्येक गावात चावडीवर
शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन होईल. शुक्रवारी (ता. १९) संघटनेने रास्ता रोको आंदोलन पुकारले असून, शनिवारी (ता. २०) गावबंद आंदोलन केले जाईल. अशा पद्धतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन टप्प्याटप्प्याने वाढत जाईल, असेही या वेळी राजू शेट्टी यांनी जाहीर केले. 

या वेळी श्री. शेट्टी यांनी कापूस, सोयाबीन उत्पादकांच्या समस्यांबाबत सविस्तर विवेचन केले. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून दिलासा मिळणे आवश्‍यक आहे. विदर्भ, मराठवाड्यातील सोयाबीन, कापूस पट्ट्यात शेतकरी त्रस्त झाले आहे. त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यातील तीन हजार कामे...पुणे : जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या शंभर दिवस...
जालन्यात गहु सोंगणीला सुरुवातपिंपळगाव रेणुकाई, जि. जालना : पिंपळगाव रेणुकाईसह...
बांबू प्रक्रियेसाठी कौशल्याची आवश्यकता...दापोली, जि. रत्नागिरी ः ‘‘विस्तार शिक्षण...
शेळी, मेंढीपालन व्यवसाय म्हणजे ‘एटीएम’...दोंडाईचा, जि. धुळे : कष्टकरी शेळी-मेंढीपालन...
ड्रॅगन फ्रूटची कलमे आगीत भस्मलांजा, जि. रत्नागिरी ः तालुक्यातील धुंदरे येथे डॉ...
नगर जिल्ह्यासाठी ५४० कोटी रुपयांचा निधी...नगर : नगर जिल्हा वार्षिक योजनेत २०२२-२३ या आर्थिक...
‘पोकरा’अंतर्गत ३२७ गावांसाठी १३०...औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (...
सोलापुरातील १३ साखर कारखाने ‘लाल यादी’तमाळीनगर, जि. सोलापूर ः यंदाच्या गाळप हंगामात...
जळगावात पावणेदोन लाख हेक्टरपर्यंत रब्बी...जळगाव ः जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ दरम्यान...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
ऊस तोडणीस विलंब; शेतकऱ्यांत चिंतासातारा ः अवेळी झालेल्या पाऊस, अनेक कारखान्यांची...
पुणे जिल्हा परिषदेवर प्रशासक?पुणे ः जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील विविध पंचायत...
गाव कोरोनामुक्त ठेवून ५० लाख जिंकापुणे ः कोरोनाच्या प्रादुर्भावापासून गावमुक्तीसाठी...
पाच जिल्ह्यांत १४ लाख हेक्‍टरवर रब्बीची...लातूर : विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी,...
मिनी विधानसभेच्या निवडणुका मार्चमध्ये...मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या राज्यातील १४...
गरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...
पंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणार?सांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...