मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे आत्मक्लेष जागर आंदोलन
औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी (ता.३) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर आत्मक्लेष जागर’ आंदोलन करण्यात आले.
औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी (ता.३) रात्री आठ वाजल्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर आत्मक्लेष जागर’ आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांवर तीन कृषी कायदे लादले आहेत. हे कायदे अन्यायी असून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहेत. दिल्लीत आठ दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत देशभरातील शेतकरी कुडकुडत बसले आहेत. तरीही केंद्र सरकार केवळ वेळकाढूपणाची भूमिका घेत आहे. त्या शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून ‘स्वाभिमानी’ने रात्रभर जागरण गोंधळ घालून भजन केले.
केंद्र सरकारला सुबुद्धी दे, शेतकऱ्यांना न्याय मिळू दे, असा जागर यावेळी करण्यात आला. युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे, मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे, पक्ष जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे, जिल्हाध्यक्ष मुक्ताराम गव्हाणे, चंद्रशेखर साळुंके, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, तालुकाध्यक्ष संपत रोडगे, सुनील शिंदे, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष आझम खान, संतोष निकम, अब्दुल राऊफ, शिवाजी हुसे, अन्वर आली, भाऊसाहेब शेळके, शाहीर विजय काटे, दुर्गेश राठोड, समाधान सुराशे, अर्जुन पाटील, आरिफ पठाण, एकनाथ देशमुख यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी आंदोलनात सहभागी झाले.
- 1 of 1029
- ››