Agriculture news in Marathi Swabhimani's complaint against Nandurbar Market Committee to the Marketing Minister | Agrowon

नंदुरबार बाजार समितीविरोधात ‘स्वाभिमानी’ची पणन मंत्र्यांकडे तक्रार 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 मे 2020

नाशिक : नंदुरबार जिल्ह्यातील पळाशी व शहादा येथे सीसीआयच्या माध्यमातून कापूस खरेदी केंद्र सुरू आहे. मात्र, कापूस खरेदीत बाजार समितीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांविरुद्धच कामकाज करीत असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला असून याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. 

नाशिक : नंदुरबार जिल्ह्यातील पळाशी व शहादा येथे सीसीआयच्या माध्यमातून कापूस खरेदी केंद्र सुरू आहे. मात्र, कापूस खरेदीत बाजार समितीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांविरुद्धच कामकाज करीत असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला असून याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. 

सीसीआय कापूस खरेदी पळाशी व शहादा येथे जिनिंगवर सुरू आहे. याकामी शेतकरी व कापूस विक्री केंद्र यांच्यात समन्वय साधण्यासाठी नंदुरबार बाजार समितीकडे जबाबदारी आहे. तर सीसीआयच्या वतीने ग्रेडर नियुक्त आहे. मात्र, ग्रेडरने ‘स्वाभिमानी’च्या प्रतिनिधींनी बाजार समितीत येऊ नये, अशी भूमिका घेतली. त्यावर जाब विचारण्यासाठी ‘स्वाभिमान’चे उत्तर महाराष्ट्र विभागीय प्रमुख घनश्याम चौधरी यांनी ग्रेडरशी संपर्क साधला. यावर बोलताना त्यांनी सांगितले की, बाजार समितीचे सभापती यांनी स्वाभिमानीचे प्रतिनिधी येथे येऊ नये असे सांगत दबाव आणत असल्याचे उत्तर दिले. त्यामुळे या प्रकरणाला अजूनच शंकेचे वळण लागले आहे. 

विक्रीपूर्वी शेतकऱ्यांना विक्री कूपन देणे व विक्री व्यवस्थेत समन्वय बाजार समितीकडे आहे. मात्र, शेतकऱ्याच्या प्रतिनिधींची अडचण कशासाठी होते? बाजार समितीमध्ये होणाऱ्या कापसाच्या खरेदीत ५ ते १० किलो कापसाची अनधिकृत कपात होते. त्याची नोंद कुठेही नसते. तसेच काही व्यापारी जर शिवार खरेदीमध्ये कमी दराने खरेदी केलेला कापूस शेतकऱ्यांच्या नावाखाली जास्त दराने सीसीआयकडे विक्री करीत आहे. मग असे शेतकऱ्यांच्या विरुद्ध कामकाज सुरू असताना बाजार समिती व ग्रेडर काय करतात असा सवाल ‘स्वाभिमानी’ने केला आहे. यावेळी ग्रेडर विरोध का करत नाही. त्यामुळे येथे गैरव्यवहार होत असल्याचा संशय घनश्याम चौधरी यांनी बोलून दाखवला. 

याबाबत स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्याकडे ही बाब आल्यानंतर त्यांनी तात्काळ पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क केला. यावेळी श्री. पाटील यांनी सगळी तक्रार ऐकून घेऊन व्हॉट्सअपवर संबंधित माहिती मागवली. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचा शब्द प्रदेशाध्यक्ष श्री. जगताप यांना दिला आहे. 

स्वाभिमानीच्या प्रतिनिधींना बाजार समितीत विरोध, क्विंटलमागे अनधिकृत कटती करून शेतकऱ्याना लुटलं जात आहे. यावर संघटना लक्ष ठेऊन होती. म्हणून त्यांचे गैरव्यवहार उघड होऊ नये यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बाजार समितीने दबाव टाकून प्रवेश बंद केला आहे. ही बाब शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आहे. 
- घनश्याम चौधरी, उत्तर महाराष्ट्र विभागीय प्रमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटना 

बाजार समित्या शेतकऱ्यांच्या खरेदी विक्रीसाठी आहेत अन स्वाभिमानी शेतकरी संघटना जर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहत असतील तर बाजार समितीला नेमकी अडचण काय? 
- संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष-स्वाभिमानी शेतकरी संघटना


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...