पटवर्धन कुरोलीत वीज उपकेंद्राच्या लाइनसाठी ‘स्वाभिमानी’चे उपोषण

पटवर्धन कुरोली, जि. सोलापूर ः पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथील ३३/११ वीज उपकेंद्राला स्वतंत्र लाइन टाकून मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारपासून (ता.३०) वीज कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.
Swabhimani's fast for power substation line at Patwardhan Kuroli
Swabhimani's fast for power substation line at Patwardhan Kuroli

पटवर्धन कुरोली, जि. सोलापूर  ः पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथील ३३/११ वीज उपकेंद्राला स्वतंत्र लाइन टाकून मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारपासून (ता.३०) वीज कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. 

पटवर्धन कुरोतील ३३/११ केव्ही उपकेंद्राला करकंब येथील वीज केंद्रातून वीज येते. याच लाइनमधून नांदोरे आणि शेवते येथील उपकेंद्राला वीजपुरवठा केला जातो. तिन्ही उपकेंद्रांना एकाच लाइनमधून विद्युतपुरवठा केला जात असल्याने तो कमी दाबाने होतो. तसेच वारंवार विद्युतपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांची उभी पिके विजेअभावी जळून चालली आहेत. 

नदीकाठी असताना सुद्धा पिकांना विजेचा मोठा फटका बसत असल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पटवर्धन कुरोली येथील उपकेंद्राला स्वतंत्र लाइन टाकून मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कांतीलाल नाईकनवरे, दशरथ जवळेकर, बाळकृष्ण नाईकनवरे, रामदास मोरे यांनी उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत लेखी आश्‍वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे कांतीलाल नाइकनवरे यांनी सांगितले. याबाबत अधीक्षक अभियंता, उपकार्यकारी अभियंता, पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com