Agriculture news in Marathi Swabhimani's movement for insurance in Jalna | Agrowon

जालन्यात विम्यासाठी ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 डिसेंबर 2021

दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर विमा वर्ग करण्यासाठी विमा कंपनीकडून दिरंगाई होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एचडीएफसी एर्गो विमा कंपनीच्या जालना येथील कार्यालयात मंगळवारी (ता. ३०) मुक्काम ठोको आंदोलन सुरू करण्यात आले.

जालना : मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर रोजी संपलेला आहे. तब्बल दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर विमा वर्ग करण्यासाठी विमा कंपनीकडून दिरंगाई होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एचडीएफसी एर्गो विमा कंपनीच्या जालना येथील कार्यालयात मंगळवारी (ता. ३०) मुक्काम ठोको आंदोलन सुरू करण्यात आले.

जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचा आंबिया बहर २०२० चा मंजूर झालेला मोसंबी फळपीक विमा अद्यापपर्यंत मिळाला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ३० नोव्हेंबर रोजी विमा कंपनी कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. या बाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एचडीएफसी एर्गो या विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधीस निवेदन देण्यात आले. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, हवामान आधारित फळपीक विमा योजनेत मोसंबी फळपिकाचा विमा मंजूर झालेला असतानाही अद्यापपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला नाही. शासन निर्णयामध्ये असे नमूद करण्यात आले, की अधिसूचित पिकाचा संरक्षण कालावधी संपल्यानंतर तीन आठवड्यांत विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणे बंधनकारक आहे. 

मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर रोजी संपलेला आहे. तब्बल दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर विमा वर्ग करण्यासाठी विमा कंपनी दिरंगाई करीत आहे. संघटनेच्या वतीने वारंवार या कंपनीकडे पाठपुरावा करण्यात आला. दरवेळी आठ दिवसांची मुदत या कंपनीकडून मागण्यात येत होती. विमा जमा करण्यासाठी ‘तारीख पे तारीख’ असे होत असल्याने शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटत आहे. जिल्ह्यातील सुमारे ३२ कोटी रुपये विमावाटप कंपनीच्या चालढकल पणामुळे रखडले आहेत. जोपर्यंत पैसे मिळत नाही, तोपर्यंत मुक्काम ठोको आंदोलन करण्यात येणार, असे ‘स्वाभिमानी’ने निवेदनात स्पष्ट केले होते.


इतर अॅग्रो विशेष
महाराष्ट्रात ३५ धान्य आधारित इथेनॉल...वृत्तसेवा - केंद्र सरकारने (Central Government)...
रशियासाठी निर्यातीच्या द्राक्ष दराचा...पुणे - महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने...
गावरान कि ब्रॉयलर चवीला कोण जबरदस्त?कोंबडीची पचनसंस्था कशी कार्य करते. तुम्ही कोंबडी...
थंडीत खा अंडी रोज सकाळी उठल्यावर कसला नाष्टा करावा जो कि...
गुणवत्तापूर्ण आंब्याला मिळवली ग्राहक...मालगुंड (ता. जि. रत्नागिरी) येथील विद्याधर...
ट्रायकोडर्मा निर्मितीसाठी शेतात उभारली...राहुल रसाळ यांनी शेत परिसरात छोटेखानी प्रयोगशाळा...
टिळा तेजाचामराठी भाषेला मातीतल्या कवितेचे लेणं चढवणाऱ्या कवी...
शेळ्यांसाठी शेंगवर्गीय चारा पिक शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडाचा पाला....
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज किनवट बाजारात...
जनावरांमध्ये अचानक गर्भपात का होतो?या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी...
सहकाराला मारक कायदे बदलण्याला प्राधान्य राज्यातील सहकारी बॅंकिंग व्यवस्थेचे अभ्यासक...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
‘जुनं ते सोनं' चा खोटेपणा "जुनी शेती खूप चांगली होती. त्या शेतीत खूप...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...