बुलडाणा जिल्ह्यात ‘स्वाभिमानी’चे ‘कोंबड्या फेको’ आंदोलन

Swabhimani's 'Punch Throw' movement in Buldana district
Swabhimani's 'Punch Throw' movement in Buldana district

बुलडाणा : ‘कोरोना’च्या भीतीमुळे अनेक व्यवसायात मंदी आली आहे. याचा परिणाम पोल्ट्रीफार्मधारक शेतकऱ्यांवर झाला आहे. आपत्ती समजून पोल्टीफार्मधारकांना शासनाने अनुदान द्यावे, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी (ता. १३)  ‘कोंबड्या फेको’ आंदोलन करण्यात आले. ‘या कोंबड्या तुम्हीच सांभाळा’ असे म्हणत अचानक ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोंबड्या सोडल्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान पोलिसांनी तुपकरांसह कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले.

कोरोना व्हायरस चिकन खाण्यातून होतो, अशी अफवा पसरल्यामुळे अनेकांनी चिकन खाणे सोडून दिले आहे. परिणामी १० रूपयाला एक कोंबडीही कोणी घेत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. पोल्ट्रीधारकांवर आत्महत्येची वेळ आली आहे. त्यामुळे पोल्ट्रीफार्मधारकांना शासनाने अनुदान द्यावे, या प्रमुख मागणीसाठी ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘कोंबड्या फेको’ आंदोलन केले. 

यावेळी पोल्ट्रीफार्मधारक शेतकऱ्यांना अनुदान द्या, शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशा गगणभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. रविकांत तुपकर व कार्यकर्त्यांनी कोंबड्या घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी प्रयत्न केला असता गेटवरच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखले. त्यामुळे संतप्त झालेल्या काही कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कोंबड्या फेकल्या. यावेळी तुपकरांनी कार्यकर्त्यांना शांत करत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरच कोंबड्या सोडल्याने एकच गर्दी झाली होती.

या आंदोलनात  प्रशांत डिक्कर, राणा चंद्रशेखर चंदन, डॉ. ज्ञानेश्वर टाले, भगवान मोरे, नितीन राजपूत, मयूर बोर्डे, पवन देशमुख, शे. रफिक शे. करीम, सचिन निकम, अमोल राऊत, अनंता मानकर, प्रतीक गावंडे, अनिल बोरकर, प्रफुल्ल देशमुख, गोपाल तायडे, विक्री तराळे, आकाश माळोदे, दत्ता जेऊघाले, महादेव चवरे, भारत खंडागळे, कडूबा मोरे, गजानन रावणकर, ज्ञानेश्वर कल्याणकर, रोशन देशमुख, महेंद्र जाधव यांचासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com