agriculture news in marathi Swabhimani's 'Rasta Roko' against electricity bill collection in Beed, Jalna district | Agrowon

बीड, जालना जिल्ह्याती वीजबिल वसुलीविरोधात ‘स्वाभिमानी’चे ‘रास्ता रोको’

टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 मार्च 2021

बीड : वीजबिल वसुलीच्या विरोधात शहरातील शिवाजी चौकात व जालना जिल्ह्यातील सुखापूरी फाट्यावर स्वामाभिनी शेतकरी संघटनेतर्फे शुक्रवारी (ता.१९) रास्ता रोको करण्यात आला.

बीड : वीजबिल वसुलीच्या विरोधात शहरातील शिवाजी चौकात व जालना जिल्ह्यातील सुखापूरी फाट्यावर स्वामाभिनी शेतकरी संघटनेतर्फे शुक्रवारी (ता.१९) रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनानंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

जालना जिल्ह्यात महावितरणकडून वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन सक्तीने तोडण्यात येत आहे. याचा निषेध करण्यासाठी ‘स्वाभिमानी’तर्फे जालना वडीगोद्री महामार्गावर सुखापुरी फाटा येथे सुमारे अर्धातास रास्ता रोको करण्यात आले. या ठिकाणी दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगाच लागल्या होत्या. महसुलचे मंडळ अधिकारी शिवाजी गाडेकर व पोलिस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

 महावितरणकडून थकीत वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचे वीजजोड सक्तीने तोडण्यात येत आहे. 

वीजबिलात घोटाळा

वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांची सक्‍तीची वीज बील वसुली थांबवावी, लॉकडाउनच्या काळातील संपूर्ण वीज बिल माफ करावे, खंडित केलेला वीज पुरवठा तत्काळ पूर्ववत करावा, ९० टक्‍के वीज बिलात रीडिंग घोटाळा आहे. तो दुरुस्त करावा, अशी मागणीही संघटनेतर्फे करण्यात आली. या प्रकरणी योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...