साताऱ्यात ‘स्वाभिमानी’चे ‘रास्ता रोको’

सातारा : वीज वितरण कंपनीच्या अन्यायकारक वीज बिलांची वसुली व वीजजोड तोडण्याविरोधात शुक्रवारी (ता.१९) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको करण्यात आला.
Swabhimani's 'Rasta Roko' in Satara
Swabhimani's 'Rasta Roko' in Satara

सातारा : वीज वितरण कंपनीच्या अन्यायकारक वीज बिलांची वसुली व वीजजोड तोडण्याविरोधात शुक्रवारी (ता.१९) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको करण्यात आला. कृष्णानगर येथील वीज वितरणच्या कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांनी महावितरणचा निषेध केला.  

कोरोना काळातील आलेल्या वाढीव वीज बिलांमुळे सर्वसामान्य जनतेला वीज बिले भरता आलेले नाही. त्यामुळे वीज वितरणची थकबाकी वाढली. त्यांनी मार्चअखेर डोळ्यासमोर ठेऊन वीज बिलांची वसुली सुरू केली आहे. तर वीज बिल न भरणाऱ्यांचे जोड तोडले जात आहेत. याचा सर्वाधिक फटका शेतकरी व सर्वसामान्य जनतेला बसला आहे. या अन्यायकारक वसुलीच्या विरोधात स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी राज्यात शुक्रवारी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याची सूचना केली होती. 

जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन झाले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले होते. जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्यासह अर्जुनराव साळुंखे, रमेश पिसाळ, संजय जाधव, विजय चव्हाण, मनोहर येवले, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात 

सातारा-कोरेगाव मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आम्ही चालत पोलिस ठाण्यात येतो, असे सांगूनही पोलिसांनी जबरदस्ती करत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे पोलिस व कार्यकर्त्यांत वादावादी झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com