‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइन

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९ वी ऊस परिषद ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. सोमवारी (ता. २) जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानाऐवजी कल्पवृक्ष गार्डन येथून दुपारी २ ला फेसबुकच्या माध्यमातून ऑनलाइन होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी शुक्रवारी (ता. ३०) दिली.
Swabhimani's sugarcane conference is online this year
Swabhimani's sugarcane conference is online this year

कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९ वी ऊस परिषद ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. सोमवारी (ता. २) जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानाऐवजी कल्पवृक्ष गार्डन येथून दुपारी २ ला फेसबुकच्या माध्यमातून ऑनलाइन होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी शुक्रवारी (ता. ३०) दिली.

श्री. पाटील म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यंदाची ही १९ वी ऊस परिषद आहे. जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावरच ही परिषद घ्यावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी शाही दसऱ्यासह इतर कार्यक्रम रद्द केले आहेत. आपली ऊस परिषद ऑनलाइन पद्धतीने घ्यावी, असे आवाहन केले होते. त्यानुसार संघटनेची ही परिषद ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.

दरम्यान यंदाच्या गळीत हंगामात साखर कारखान्यांनी प्रतिटन उसाला किती दर द्यावा, यासाठी शनिवार (ता. ३१) सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृहात शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या अध्यक्षांची बैठक होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सोमवारी (ता. २) ऑनलाइन ऊस परिषद होणार आहे. तत्पूर्वीच साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. यानंतर ही बैठक घेण्याचे ठरले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com