Agriculture news in Marathi, Swabhimani's Vidarbha president shot inquiry start | Agrowon

स्वाभिमानीच्या विदर्भ अध्यक्षांवरील गोळीबाराची चौकशी सुरू
टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

अमरावती ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष व वरुड-मोर्शी मतदारसंघाचे आघाडी पुरस्कृत उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावरील हल्ला प्रकरणात मंगळवार (ता. २२) पर्यंत कोणालाही अटक करण्यात पोलिसांना यश आले नव्हते. दरम्यान भुयार यांच्या गाडीवर गोळीबार झाला किंवा नाही याची खातरजामा करण्यासाठी घटनास्थळावरून काही नमुने घेत ते फॉरेन्सिक लॅबला पाठविले, असे पोलिस निरीक्षक एस. एम. गेडाम यांनी सांगितले.

अमरावती ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष व वरुड-मोर्शी मतदारसंघाचे आघाडी पुरस्कृत उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावरील हल्ला प्रकरणात मंगळवार (ता. २२) पर्यंत कोणालाही अटक करण्यात पोलिसांना यश आले नव्हते. दरम्यान भुयार यांच्या गाडीवर गोळीबार झाला किंवा नाही याची खातरजामा करण्यासाठी घटनास्थळावरून काही नमुने घेत ते फॉरेन्सिक लॅबला पाठविले, असे पोलिस निरीक्षक एस. एम. गेडाम यांनी सांगितले.

वरुड-मोर्शी मतदारसंघात देवेंद्र भुयार आणि भाजपचे उमेदवार, तसेच कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्यात थेट लढत आहे. देवेंद्र भुयार यांनी शेतकरी पूत्र असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आमदारकीची संधी देण्याचे भावनिक आवाहन मतदारांना केले होते. दुसरीकडे सिंचन सुविधात वाढ, संत्रा प्रक्रिया उद्योग या भागात आणण्यासाठी निवडून देण्याची साद कृषिमंत्री डॉ. बोंडे यांनी घातली होती. दोघांच्या प्रचाराचा ज्वर वाढल्याने या मतदारसंघातील वातावरणही चांगलेच तापले होते. दरम्यान ऐन मतदानाच्या दिवशी (ता. २१) पहाटे साडेपाच वाजता मलकापूरकडे जात असलेल्या देवेंद्र भुयार यांच्या कारवर तीन गोळ्या झाडण्यात आल्याचा आरोप आहे.

हा हल्ला कसाबसा चुकवीत देवेंद्र भुयार यांच्यासह गाडीतील तिघांनी हल्लेखोरांच्या तावडीतून पळ काढला. त्यानंतर हल्लेखोरांनी गाडीला आग लावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शेंदूरजना घाट पोलिसांत अज्ञात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आकाश नागपुरे यांनी तक्रार दिली होती. 

दरम्यान या संदर्भाने देवेंद्र भुयार यांच्याशी संपर्क साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी मात्र पराभव दिसत असल्याने हे कुंभाड स्वतःच आघाडीच्या उमेदवाराने रचल्याचे सांगितले. 

या प्रकरणी अज्ञात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबाराच्या संदर्भाने सत्यता पडताळण्याकरिता घटनास्थळावरील साहित्याचे नमुने घेत फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालाअंती पुढील कारवाई केली जाणार आहे. 
- एस. एम. गेडाम, 
पोलिस निरीक्षक, शेंदूरजनाघाट, ता. वरुड, जि. अमरावती

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ९९ टक्‍क्‍...सातारा ः जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी; तसेत...
परभणी जिल्ह्यातील २० मंडळांमध्ये...परभणी ः दोन वर्षांच्या खंडानंतर परभणी जिल्ह्यात...
‘स्वाभिमानी’चे ठिय्या आंदोलन सुरू  सातारा ः जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना...
परभणी जिल्ह्यात रब्बीचे सव्वापाच टक्के...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०१९-२०) रब्बी...
पुणे ः नऊ हजार हेक्टरवरील भाजीपाल्याचे...पुणे ः गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी...
जालना : निर्यातक्षम द्राक्षांच्या...जालना : निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी...
लडाखला उभारणार सेंद्रिय शेती संशोधन...पुणे ः विविध शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनावर...
नगर जिल्ह्यामध्ये २४१ वैयक्तिक पाणी...नगर ः वीस दिवस सतत पाऊस पडल्याने पाणीपातळी वाढली...
शेतकऱ्यामुळे टळला रेल्वे अपघात ! नगर : मनमाड-दौंड रेल्वेरुळाला विळद-देहरे गावच्या...
अतिपावसाने नगरमधील शेतजमिनी चिबडल्यानगर  : अतिपावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले...
नांदेड जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवरील...नांदेड : नांदेड जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या...
वर्धा जिल्ह्यातील ६०० हेक्‍टरवरील ...वर्धा  ः जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे...
दक्षिण महाराष्ट्रातील साखर...कोल्हापूर  : दक्षिण महाराष्ट्रात पावसाने...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे उन्हाळ...नाशिक  : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या...
ऊसतोड कामगारांच्या रोजगारावर होणार...नगर ः गतवर्षी दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र घटले....
वऱ्हाडातील प्रकल्प तुडुंबअकोला  ः गेल्या महिन्यात सतत झालेल्या...
नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यांवर धाडीनाशिक  : देशभरात कांद्याचा साठा संपुष्टात...
पीक व्यवस्थापन सल्ला सध्या मोठ्या प्रमाणात झालेल्या परतीच्या पावसामुळे...
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दरातही...नागपूर ः येथील कळमणा बाजार समितीत नव्या सोयाबीनची...
जळगाव बाजारात केळीची आवक रखडतजळगाव ः जिल्ह्यात केळीची आवक रखडतच सुरू असून,...