Agriculture news in marathi Sweet lemon cluster in Paithan: Rohio Minister Bhumare | Agrowon

पैठण येथे होणार मोसंबी क्‍लस्टर ः ‘रोहयो’मंत्री भुमरे

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

पैठण, जि. औरंगाबाद  : ‘‘मोसंबीमधील लागवडीचे अंतर कमी करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. शिवाय मराठवाड्यात पैठण येथे लागवड, प्रक्रिया ते विक्रीपर्यंतचे मोसंबीचे १५ कोटी रुपयांचे क्‍लस्टर ‘मोसंबी उत्पादक शेतकरी सेवा केंद्र'' या नावाने सुरू करण्यात येईल,’’ अशी माहिती रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांनी शुक्रवारी (ता.१४) दिली. 

पैठण, जि. औरंगाबाद  : ‘‘मोसंबीमधील लागवडीचे अंतर कमी करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. शिवाय मराठवाड्यात पैठण येथे लागवड, प्रक्रिया ते विक्रीपर्यंतचे मोसंबीचे १५ कोटी रुपयांचे क्‍लस्टर ‘मोसंबी उत्पादक शेतकरी सेवा केंद्र'' या नावाने सुरू करण्यात येईल,’’ अशी माहिती रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांनी शुक्रवारी (ता.१४) दिली. 

चांगतपुरी फाटा (ता. पैठण) येथील गणेश मडके यांच्या शेतात कृषी विभागातर्फे ‘ठिबक सिंचन तंत्रज्ञान व कमी पाण्यात जास्त उत्पादन’ या विषयावर शेतकरी मेळावा घेण्यात आला. जनजागृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भगवानराव कापसे, जिल्हा दूध सहकारी संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, सिंजेंटाचे के. सी. रवी,  पी. एस. जगदीशा, कापूसतज्ज्ञ डॉ. एस. एस. बैनाडे, डॉ. एस. बी. पवार, डॉ. किशोर झाडे, कृषी अभियांत्रिकी विषय विशेषज्ज्ञ प्रा. गीता यादव, त्र्यंबक पाथ्रीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

भुमरे म्हणाले, ‘मोसंबी फळबागांचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना शेती तंत्रज्ञानाची आवश्‍यकता आहे. संत्र्याच्या तुलनेत लागवडीतील तफावतीमुळे मिळणारे अनुदानही कमी आणि उत्पादनही कमी मिळत आहे. त्यामुळे मोसंबी, संत्रा लागवडीचे अंतर सारखेच ठेवण्याविषयी प्रयत्न सुरू आहेत. कृषितज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन हे काम केले जाईल. फळबाग वाढीसाठी शासनाकडून फलोत्पादनमंत्री या नात्याने मोठी मदत मोसंबी उत्पादकांना मिळवून दिली जाईल. त्यात औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील गोदाकाठच्या मोसंबी उत्पादकांवर विशेष लक्ष असेल.’’

कापसाची शेती अशी फायद्याची

कापूसतज्ज्ञ डॉ. बैनाडे म्हणाले, ‘‘कापसाची शेती फायद्याची करण्यासाठी वेळेत पऱ्हाटी नष्ट करणे, विभागानुसार कापसाचे हब व त्यानुसारच वाणांची निश्‍चिती व तेच उपलब्ध होण्याची सोय, लागवडीपासून काढणीपर्यंतचे भाडेतत्त्वावर तंत्रज्ञान, सुक्ष्म सिंचनाशिवाय कापसाची लागवड न करणे, कापसाची रूईच्या स्वरूपात विक्री व खर्चाच्या तुलनेत हमीभाव मिळणे आवश्‍यक आहे. डॉ. कापसे यांनी फळबागांची इतर देश व इतर भागातील स्थितीची मराठवाड्याशी  तुलनात्मक स्थिती व त्याचे परिणाम व उपायाविषयी सादरीकरणातून माहिती दिली.


इतर ताज्या घडामोडी
चढ्या दराने कांदा बियाणे विक्री पडली...नाशिक : सध्या कांद्याच्या बियाण्यांचा मोठ्या...
केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांना ‘बोनस’...नवी दिल्ली : कोरोनासंकटामुळे महागाई भत्ता...
कृषी क्षेत्रात ‘पंदेकृवि’ची भरीव...अकोला ः कृषी विद्यापीठाने कृषी क्रांतीचे प्रणेते...
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ः मुख्यमंत्री...उस्मानाबाद : खचून जाऊ नका, धीर धरा, शासन पूर्ण...
सरकारची शेतकऱ्यांना कोरडी आश्‍वासने :...जिंतूर, जि. परभणी, हिंगोली ः अतिवृष्टीमुळे...
एकनाथ खडसे उद्या ‘राष्ट्रवादी’तमुंबई : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या...
नगर जिल्ह्यात पिकांचे ६३ हजार हेक्टरवर...नगरः सप्टेंबर महिन्यातील सलगच्या २० दिवसांच्या...
शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये...
सातारा जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टर...सातारा : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील...
वर्धा जिल्ह्यात यंदा ६४ टक्के पीक...वर्धा  :  कर्जमाफी आणि शासनाच्या...
कासोळा फाट्यावर ‘स्वाभिमानी’चा रास्ता...यवतमाळ :  शेतकऱ्यांच्या विविध...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष बागांची छाटणी...सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे...
रत्नागिरीत सप्टेंबरमध्ये ३४ हेक्टर...रत्नागिरी ः मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात...
जळगाव जिल्ह्यात मुबलक पाणीजळगाव :  जळगाव जिल्ह्यातील मोठ्या व...
इगतपुरी तालुक्यात पावसामुळे २८५२...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या...
चिखलीतील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ‘रयत’...बुलडाणा : चिखली तालुक्यातील पळसखेडा जयंती फाटा ते...
नांदेड जिल्ह्यात ओल्या दुष्काळासाठी...नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपासह बागायती...
कांदा बीजोत्पादनाच्या शास्त्रीय पद्धती बिजोत्पादन करताना जातीची शुद्धता, मानक प्रमाण आणि...
सरकारने नाकर्तेपणा दाखवू नये : दरकेर सोलापूर ः राज्य सरकार पंचनाम्याशिवाय मदत...
द्राक्ष पीक : पावसामुळे उद्भवलेल्या...सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, सर्व द्राक्ष...