agriculture news in marathi sweet potato arrival in market committee pune maharashtra | Agrowon

पुणे बाजार समितीत रताळ्यांची २० टन आवक; दर स्थिर

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

पुणे  ःकार्तिकी एकादशीनिमित्ताने पुणे बाजार समितीत मंगळवारी (ता. १९)  रताळ्यांची सुमारे २० टन आवक झाली. या वेळी रताळ्यांना १०० ते २०० रुपये प्रतिदहा किलो असा दर होता. ही आवक कोल्हापूर, कराड, सोलापूर भागातून होत असून, आणखी दोन दिवस ही आवक सुरू राहील. गेल्या तीन ते चार दिवसांपासून रोज सरासरी २० टन आवक होत असल्याचे रताळ्याचे प्रमुख आडतदार सोमनाथ भोसले यांनी सांगितले. सध्या आवक आणि मागणी सरासरी असल्याने दर देखील स्थिर होते. 

पुणे  ःकार्तिकी एकादशीनिमित्ताने पुणे बाजार समितीत मंगळवारी (ता. १९)  रताळ्यांची सुमारे २० टन आवक झाली. या वेळी रताळ्यांना १०० ते २०० रुपये प्रतिदहा किलो असा दर होता. ही आवक कोल्हापूर, कराड, सोलापूर भागातून होत असून, आणखी दोन दिवस ही आवक सुरू राहील. गेल्या तीन ते चार दिवसांपासून रोज सरासरी २० टन आवक होत असल्याचे रताळ्याचे प्रमुख आडतदार सोमनाथ भोसले यांनी सांगितले. सध्या आवक आणि मागणी सरासरी असल्याने दर देखील स्थिर होते. 

आषाढी आणि कार्तिकी एकादशीसाठी शेतकरी नियोजन करून रताळ्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतात. यामध्ये आषाढीसाठी लागवडीचे प्रमाण जास्त आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी आणि पावसाचा परिणाम रताळे उत्पादनावर झाला असल्याने आवक कमी आहे. त्यास मागणीदेखील तुलनेने कमी असल्याने दर स्थिर आहे. कार्तिकी एकादशीला आळंदी येथे संत श्री ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या समाधी दर्शनासाठी राज्यातून वारकरी दाखल होत असल्याने त्या भागातील लहान व्यावसायिकांकडून रताळ्याला मोठी मागणी असल्याचे श्री. भोसले यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही...
नाशिक बाजार समितीतील कर्मचारी...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी...सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात...
नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची...नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर...
पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील...
वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य...पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२...
दहिवडीत शेतीकामांच्या मजुरीदरांसह...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख...औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर...
उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या...
वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून...पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील...
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं...भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी...
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न...भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित...
परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०...वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत...
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर...चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी...
पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात...चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत...
जलालखेडा येथील दीडशे शेतकरी...नागपूर : खरीप कर्जाचे वाटप शनिवार (ता. १५) पर्यंत...
सांगली जिल्ह्यात डाळिंब संकटांच्या...सांगली ः वातावरणातील बदलाने डाळिंबावर तेलकट डाग...