साखर दरवाढीची गोडी कायम

गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या तेजीमुळे सप्टेंबर महिन्याचा विक्री कोटा पूर्ण संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सप्टेंबरच्या उत्तरार्धात ही साखरेचे दर सातत्याने ३५०० रुपये प्रतिक्विंटलच्या वर राहिले आहेत
The sweetness of sugar price hike remains
The sweetness of sugar price hike remains

कोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या तेजीमुळे सप्टेंबर महिन्याचा विक्री कोटा पूर्ण संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सप्टेंबरच्या उत्तरार्धात ही साखरेचे दर सातत्याने ३५०० रुपये प्रतिक्विंटलच्या वर राहिले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी असल्याने ऑक्टोबरमध्ये ही दर चांगले राहण्याची शक्यता असल्याने ऑक्टोबरचा कोटाही संपेल, असा अंदाज साखर उद्योगाच्या सूत्रांचा आहे. 

आगामी काळात दसरा, दिवाळीसारखे सण आहेत. पंधरा दिवसांपासून राज्यातील बहुतांशी बाजारपेठा जवळ जवळ पूर्ण खुल्या झाल्या. व्यवहार पूर्वपदावर येत असल्याने साखरेच्या मागणीत वाढ होत आहे. शीतपेये उद्योगातून फारशी मागणी नसली, तरी सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर मिठाई उद्योगातून हळूहळू मागणी वाढत आहे.  दिवाळीपर्यंत बाजारपेठ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास ऑक्टोबरचा पूर्ण साखर कोटा ही संपेल असा आशावाद साखर उद्योगाचा आहे.

केंद्राकडून प्रत्येक महिन्याला देशातील सर्व साखर कारखान्यांना २१ ते २२ लाख टन साखर विक्रीचा कोटा येतो, यापैकी सुमारे सहा ते सात लाख टन साखर महाराष्ट्रातील कारखान्यांच्या वाट्याला येते. जुलैपर्यंत यातील निम्मी साखर ही विक्री करताना साखर कारखान्यांची मोठी कसरत होत होती. ऑगस्टच्या उत्तरार्धात मात्र साखरेच्या दराने उच्चांकी मजल मारल्याने साखर विक्रीत वाढ झाली. एक ते दीड महिन्यापासून साखरेचे दर तेजीतच आहेत. मध्यम साखरे बरोबरच  लहान आकाराच्या साखरेलाही चांगले दर मिळत असल्याने साखर कारखानदारात उत्साह आहे. साखरेला मागणी असल्याने सप्टेंबरसह ऑक्टोबरच्या पूर्ण कोट्याची साखर विक्री होण्याची शक्यता साखर कारखान्यांच्या सूत्रांनी व्यक्त केली. 

४२ लाख टन साखर शिल्लक राहण्याचा अंदाज गेल्या हंगामात १०६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यापैकी ऑगस्ट २०२१अखेर राज्यात ४८ लाख टन साखर शिल्लक होती. सप्‍टेंबरअखेर यातील ६ ते ७ लाख टन साखर विक्री होईल, असा अंदाज आहे. सणासुदीचीमुळे ऑक्टोबरमध्येही तितकीच साखर विक्री होईल. यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला साधारणपणे ४१ ते ४२ लाख टन साखर शिल्लक राहील, असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांचा आहे.

साखरेचे वाढलेले दर कायम आहेत. सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर येत्या महिन्याभरात ही साखरेला चांगली मागणी राहील. त्यामुळे दर चांगले राहतील, असा अंदाज आहे. - विश्‍वजित शिंदे, साखर तज्ज्ञ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com