Agriculture news in Marathi The sweetness of sugar price hike remains | Page 2 ||| Agrowon

साखर दरवाढीची गोडी कायम

राजकुमार चौगुले
शनिवार, 25 सप्टेंबर 2021

गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या तेजीमुळे सप्टेंबर महिन्याचा विक्री कोटा पूर्ण संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सप्टेंबरच्या उत्तरार्धात ही साखरेचे दर सातत्याने ३५०० रुपये प्रतिक्विंटलच्या वर राहिले आहेत

कोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या तेजीमुळे सप्टेंबर महिन्याचा विक्री कोटा पूर्ण संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सप्टेंबरच्या उत्तरार्धात ही साखरेचे दर सातत्याने ३५०० रुपये प्रतिक्विंटलच्या वर राहिले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी असल्याने ऑक्टोबरमध्ये ही दर चांगले राहण्याची शक्यता असल्याने ऑक्टोबरचा कोटाही संपेल, असा अंदाज साखर उद्योगाच्या सूत्रांचा आहे. 

आगामी काळात दसरा, दिवाळीसारखे सण आहेत. पंधरा दिवसांपासून राज्यातील बहुतांशी बाजारपेठा जवळ जवळ पूर्ण खुल्या झाल्या. व्यवहार पूर्वपदावर येत असल्याने साखरेच्या मागणीत वाढ होत आहे. शीतपेये उद्योगातून फारशी मागणी नसली, तरी सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर मिठाई उद्योगातून हळूहळू मागणी वाढत आहे.  दिवाळीपर्यंत बाजारपेठ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास ऑक्टोबरचा पूर्ण साखर कोटा ही संपेल असा आशावाद साखर उद्योगाचा आहे.

केंद्राकडून प्रत्येक महिन्याला देशातील सर्व साखर कारखान्यांना २१ ते २२ लाख टन साखर विक्रीचा कोटा येतो, यापैकी सुमारे सहा ते सात लाख टन साखर महाराष्ट्रातील कारखान्यांच्या वाट्याला येते. जुलैपर्यंत यातील निम्मी साखर ही विक्री करताना साखर कारखान्यांची मोठी कसरत होत होती. ऑगस्टच्या उत्तरार्धात मात्र साखरेच्या दराने उच्चांकी मजल मारल्याने साखर विक्रीत वाढ झाली. एक ते दीड महिन्यापासून साखरेचे दर तेजीतच आहेत. मध्यम साखरे बरोबरच  लहान आकाराच्या साखरेलाही चांगले दर मिळत असल्याने साखर कारखानदारात उत्साह आहे. साखरेला मागणी असल्याने सप्टेंबरसह ऑक्टोबरच्या पूर्ण कोट्याची साखर विक्री होण्याची शक्यता साखर कारखान्यांच्या सूत्रांनी व्यक्त केली. 

४२ लाख टन साखर शिल्लक राहण्याचा अंदाज
गेल्या हंगामात १०६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यापैकी ऑगस्ट २०२१अखेर राज्यात ४८ लाख टन साखर शिल्लक होती. सप्‍टेंबरअखेर यातील ६ ते ७ लाख टन साखर विक्री होईल, असा अंदाज आहे. सणासुदीचीमुळे ऑक्टोबरमध्येही तितकीच साखर विक्री होईल. यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला साधारणपणे ४१ ते ४२ लाख टन साखर शिल्लक राहील, असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांचा आहे.

साखरेचे वाढलेले दर कायम आहेत. सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर येत्या महिन्याभरात ही साखरेला चांगली मागणी राहील. त्यामुळे दर चांगले राहतील, असा अंदाज आहे.
- विश्‍वजित शिंदे, साखर तज्ज्ञ


इतर बातम्या
नांदेड जिल्ह्यात रब्बीची पेरणी सुरुनांदेड : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून थंडी...
तापमानातील तफावत वाढलीपुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच...
शेतकऱ्यांना तत्काळ कर्जासाठी कृषी कर्ज...नगर : राज्यातील शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरीत्या...
तलाठ्यांच्या संपामुळे कामे खोळंबली नगर : तलाठ्यांच्या कामकाजासंदर्भात समन्वय...
तेलबिया आणा अन् खाद्यतेल घेऊन जापुणे : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिवाजीनगर...
पूर्व विदर्भात करडईची होणार चार हजार...नागपूर ः देशाची खाद्यतेलाची गरज भागविण्याकरिता...
सोयाबीनच्या आवकेसह मागणीही वाढणारपुणे : देशभरातील बाजारात चालू सप्ताहात दैनंदिन...
परभणी कृषी विद्यापीठाकडून कुशल...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यंदा...
पुणे : रब्बीसाठी ३३,५०० क्विंटल...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
परभणी : सव्वा लाखावर पंचनामे प्रलंबित परभणी : जिल्ह्यातील पंतप्रधान पीकविमा...
हिंगोलीत सोयाबीनचे दर  ४६५० ते ४८५०...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
 कांदा दरात पुन्हा झाली घसरण नगर : दर मिळेल या आशेने गत वर्षीचा उन्हाळी,...
नागपुरात १९ हजार हेक्टरवरील पिके नष्ट नागपूर : ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यादरम्यान झालेली...
कांद्याचे भाव वाढल्यावरच  का पाडले...येवला, जि. नाशिक : उन्हाळ कांद्याचे भाव वाढून...
पीक नुकसानी भरपाई मिळणार वाढीव दराने  येवला, जि. पुणे : निसर्गाच्या आपत्तीत अतिवृष्टी व...
राष्ट्रीय स्तरावरील साखर उद्योगातील...कोल्हापूर : नवी दिल्लीच्या राष्ट्रीय सहकारी साखर...
दहा वर्षांवरील हरभरा वाणांना अनुदान नाहीपुणे ः राज्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना हरभरा...
यंदा कापूस तेजीतच राहणारपुणे : महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात...
पावसाने वाढली सोयाबीनची आवक नागपूर ः मध्य प्रदेशात पावसाच्या शक्‍यतेमुळे...
ड्रायपोर्टमुळे संत्रा निर्यातीला चालनानागपूर : वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथे...