Agriculture news in Marathi The sweetness of sugar price hike remains | Page 3 ||| Agrowon

साखर दरवाढीची गोडी कायम

राजकुमार चौगुले
शनिवार, 25 सप्टेंबर 2021

गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या तेजीमुळे सप्टेंबर महिन्याचा विक्री कोटा पूर्ण संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सप्टेंबरच्या उत्तरार्धात ही साखरेचे दर सातत्याने ३५०० रुपये प्रतिक्विंटलच्या वर राहिले आहेत

कोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या तेजीमुळे सप्टेंबर महिन्याचा विक्री कोटा पूर्ण संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सप्टेंबरच्या उत्तरार्धात ही साखरेचे दर सातत्याने ३५०० रुपये प्रतिक्विंटलच्या वर राहिले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी असल्याने ऑक्टोबरमध्ये ही दर चांगले राहण्याची शक्यता असल्याने ऑक्टोबरचा कोटाही संपेल, असा अंदाज साखर उद्योगाच्या सूत्रांचा आहे. 

आगामी काळात दसरा, दिवाळीसारखे सण आहेत. पंधरा दिवसांपासून राज्यातील बहुतांशी बाजारपेठा जवळ जवळ पूर्ण खुल्या झाल्या. व्यवहार पूर्वपदावर येत असल्याने साखरेच्या मागणीत वाढ होत आहे. शीतपेये उद्योगातून फारशी मागणी नसली, तरी सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर मिठाई उद्योगातून हळूहळू मागणी वाढत आहे.  दिवाळीपर्यंत बाजारपेठ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास ऑक्टोबरचा पूर्ण साखर कोटा ही संपेल असा आशावाद साखर उद्योगाचा आहे.

केंद्राकडून प्रत्येक महिन्याला देशातील सर्व साखर कारखान्यांना २१ ते २२ लाख टन साखर विक्रीचा कोटा येतो, यापैकी सुमारे सहा ते सात लाख टन साखर महाराष्ट्रातील कारखान्यांच्या वाट्याला येते. जुलैपर्यंत यातील निम्मी साखर ही विक्री करताना साखर कारखान्यांची मोठी कसरत होत होती. ऑगस्टच्या उत्तरार्धात मात्र साखरेच्या दराने उच्चांकी मजल मारल्याने साखर विक्रीत वाढ झाली. एक ते दीड महिन्यापासून साखरेचे दर तेजीतच आहेत. मध्यम साखरे बरोबरच  लहान आकाराच्या साखरेलाही चांगले दर मिळत असल्याने साखर कारखानदारात उत्साह आहे. साखरेला मागणी असल्याने सप्टेंबरसह ऑक्टोबरच्या पूर्ण कोट्याची साखर विक्री होण्याची शक्यता साखर कारखान्यांच्या सूत्रांनी व्यक्त केली. 

४२ लाख टन साखर शिल्लक राहण्याचा अंदाज
गेल्या हंगामात १०६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यापैकी ऑगस्ट २०२१अखेर राज्यात ४८ लाख टन साखर शिल्लक होती. सप्‍टेंबरअखेर यातील ६ ते ७ लाख टन साखर विक्री होईल, असा अंदाज आहे. सणासुदीचीमुळे ऑक्टोबरमध्येही तितकीच साखर विक्री होईल. यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला साधारणपणे ४१ ते ४२ लाख टन साखर शिल्लक राहील, असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांचा आहे.

साखरेचे वाढलेले दर कायम आहेत. सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर येत्या महिन्याभरात ही साखरेला चांगली मागणी राहील. त्यामुळे दर चांगले राहतील, असा अंदाज आहे.
- विश्‍वजित शिंदे, साखर तज्ज्ञ


इतर बातम्या
सोलापूर ः रब्बी हंगामातील प्रमुख...सोलापूर ः शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा बेसुमार व...
विमा कंपन्यांवर गुन्हे नोंद करा : अजित...मुंबई ः सोयाबीन, कापूस उत्पादकांसह राज्यातील सर्व...
पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल कारखान्याला...सोलापूर ः पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी...
 मोबाइल रसवंती ठरली शेतीला आधार आर्णी, जि. यवतमाळ ः रोजगार आणि नोकरीच्या शोधात...
परभणीत लाळ्या खुरकूत लसीकरण थंडावले परभणी ः जिल्ह्यात लस मात्रा उपलब्ध न झाल्यामुळे...
  कृषी विभागाकडून आतापर्यंत  सात...पुणेः कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाने...
मराठवाड्यात ६८५ लघू प्रकल्पांत ७५ टक्‍...औरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघू प्रकल्पांत ८७...
बिळाशी परिसरातील ऊस लागला वाळूबिळाशी, जि. सांगली ः जुलै-ऑगस्टमध्ये आलेल्या...
द्राक्ष बागाईतदार संघाने मांडल्या...नाशिक : द्राक्ष निर्यातीबाबत या हंगामात...
रायगड जिल्ह्यातील १७९ ग्रामपंचायतीमध्ये...अलिबाग : रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील रिक्त...
पुणे विभागात रब्बीच्या पेरण्यांना येईना...पुणे : गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण तयार होत...
‘आत्मा’ शेतकरी सल्लागार समित्यांना...नगर ः कृषी विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीसह ‘...
अनियमित वीजपुरवठ्याने नांदेड जिल्ह्यात...नांदेड : खरिपाचा हंगाम अतिवृष्टीमुळे हातचा...
खानदेशात पावसाचा धुमाकूळ सुरूच  जळगाव ः  खानदेशात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
ऑक्टोबरमध्ये बाजारात आला ३१.१३ लाख गाठी...पुणे ः कापूस हंगाम एक ऑक्टोबरला सुरू झाल्यानंतर...
जळगाव बँकेच्या अध्यक्षपदासाठी  देवकर,...जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी...
केव्हीकेतर्फे कीडनियंत्रण सापळ्यांचे...वाशीम : अन्नधान्याचे उत्पादन वाढविणे जसे...
कृषिपंपांसाठी ‘प्रहार’ करणार आंदोलनभंडारा ः आधारभूत खरेदी केंद्राअभावी शेतकऱ्यांच्या...
नाशिक: बच्चू कडू यांच्याकडून जलसंपदा...नाशिक: राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू...
नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पीक...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजना रब्बी हंगाम सन...