पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू

पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू

उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा विषय बनलेल्या स्वाईन फ्लूने जिल्ह्यातही आपले प्रताप दाखविण्यास सुरुवात केली असुन, मागील महिनाभराच्या काळात तब्बल नऊ जणांचा मृत्यु स्वाईन फ्लूमुळे झाला आहे. तर इतर आजारांच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य असलेल्या या आजाराचे जिल्ह्याच्या विविध भागात मिळुन सत्ताविसहुन अधिक 'पॉझिटिव्ह' रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरातील विविध शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये सत्ताविस संशयित रुग्णांच्यावर उपचार सुरु आहेत. तर मागील आठ दिवसांच्या काळात हवेली तालुक्यातील एकट्या उरुळी कांचन गावातील दोन महिलांचा मृत्यु स्वाईन फ्लूमुळे झाल्याने उरुळी कांचन व परीसरात खळबळ उडाली आहे.  उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचा गुरुवारी (ता. 13) तर सीमा चंद्रकांत येवारे यांचा आठ दिवसापुर्वी स्वाईन फ्लूमुळे मृत्यु झावा. आठ दिवसाच्या आत एकाच गावातील दोन महिलांचा मृत्यु झाल्यामुळे उरुळी कांचन व परीसरात खळबळ उडाली. या पार्श्वभुमीवर जिल्हाची माहिती घेतली असता, महिनाभऱात नऊ जणांचा मृत्यु व सत्ताविस जण संशयित रुग्ण अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

दरम्यान याबदद्ल अधिक माहिती देताना जिल्हा परीषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने म्हणाले, महिनाभरात काळात स्वाईन फ्लूमुळे नऊ जणांचा मृत्यु झाला आहे तर सत्ताविस जण 'पॉझिटिव्ह' रुग्ण आढळले ही बाब खरी आहे. विषाणू संशोधन केद्रांच्या माध्यमातुन अकरा रुग्न 'पॉझिटिव्ह' असल्याचे आढळुन आले, तर उर्वरीत सोळा रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रातील किटमुळे समजले आहेत. पंधरा दिवसापासुन जिल्हातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात या रोगासंदर्भात समुपदेश सुरु करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी या नात्याने चाकण, उरुळी कांचन, आंबळीसह इतर ठिकाणी भेट देऊन, हा संसर्गजण्य रोग रोखण्यासाठी योग्य त्या उपाय योजना करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.

जिल्हाच्या विविध भागात स्वाइन फ्लूमुळे मृत्युमखी पडलेल्या रुग्नांची नावे : प्रभावती वाल्मिक कांचन (वय- 60 वर्षे) व सीमा चंद्रकांत येवारे (वय- ४३ वर्षे, रा. दोघीही, रा. उरुळी कांचन ता. हवेली), संपत तारू चोरगे (वय-४० वर्षे, रा. गोनशेत ता. मावळ), शंकर विठ्ठल कोकणे (वय-७२ वर्षे, रा. लाडेवाडी ता. आंबेगाव), सूचना भीमराव कोली (वय- ७५ वर्षे, रा. माण ता. मुळशी), अनिल खंडेलवाल (वय-५८ वर्षे, रा. मंगेललाल चिक्की, लोणावळा ता. मावळ), भारत शहाजी शिवले (वय-३३ वर्षे, रा. म्हाळुंगे इंगळे ता. खेड), गणपत गंगाराम सुतार (वय-५७ वर्षे, रा. अंबोली ता.पुरंदर) व आर्या स्वप्नील खंडागळे (वय-४ वर्षे, रा. आपटी ता. शिरूर) 

आरोग्य यंत्रणा सज्ज- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने.  याबद्दल बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने म्हणाले, जिल्हाच्या विविध भागात स्वाइन फ्लूचा झपाट्याने प्रसार होत आहे ही बाब खरी आहे. मात्र यापुढील काळात या आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून आरोग्य यंत्रणा सरसावली असून, जिल्हा परीषदेच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आपआपल्या हद्दीत खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. जिल्ह्यांमधील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातुन संशयित रुग्नांचे व त्यांच्या नातेवाईंकांचे सर्वेक्षण करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबरच, सर्वच शाशकिय रुग्नालयात स्वाइन फ्लूसाठी वापरण्यात येणाऱ्या टॅमी फ्लू औषधांचा पुरेसा साठा उपलब्द असुन, स्वाइन फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य यंत्रना सुसज्ज ठेवली आहे

लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय...   सर्दी, खोकला, वारंवार शिंका, घशात खवखव, थंडी वाजून ताप, अंगदुखी ही ‘स्वाइन फ्लू’ची लक्षणे आहेत. या रुग्णाने त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होतो. याची बाधा इतरांना होऊ नये म्हणून रुग्णाने एका खोलीतच आराम करणे, गर्दीत जाणे टाळणे, इतरांच्या संपर्कात न येणे, वारंवार हात साबणाने स्वच्छ धुणे गरजेचे आहे. हा रुग्ण केवळ स्वाइन फ्लूने दगावत नसून त्यामुळे फुफ्फुसावर होणारा घात व निमोनियामुळे त्याचा मृत्यू होतो. 

आजार कशामुळे होतो..  स्वाईन फ्लू हा आजार श्‍वसन यंत्रणेशी संबंधित असून, तो  एच १ एन १ या अत्यंत घातक विषाणूंमुळे होतो. हवेच्या माध्यमातून या विषाणूचा प्रसार होत असल्यामुळे एका रुग्णापासून दुसर्‍याला या आजाराची लागण होते. तसेच या विषाणूंचा प्रसार रुग्णांच्या नाकातील व घशातील स्राव, त्याचा घाम, त्याच्या थुंकीमधून होतो. आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असली, तरी नागरिकांनी खबरदारी घेतल्यास स्वाइन फ्लूचा धोका टाळता येऊ शकतो. स्वाइन फ्लुपासुन वाचण्याचा स्रवोत्तम उपाय म्हणजे गर्दीत जाताना मास्क अथना रुमालाचा वापर करणे होय. यातुनही लक्षणे स्वाइन फ्लू ची लक्षणे आढळल्यास आपआपल्या हद्दीतील जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासनी करुन घ्यावी. - डॉ. सुचिता कदम (आरोग्य अधिकारी, उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्र). 

संशयित रुग्णांचा हलगर्जीपणा दरम्यान स्वाइन फ्लुचा प्रसार होण्यास रुग्नांच्या नातेवाईक मोठ्या प्रमानात कारणीभुत असल्याचा आरोप जिल्हा परीषदेच्या एका वरीष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने केला आहे. याबाबत बोलतांना संबधित अधिकारी म्हणाले, उरुळी कांचनमधील ज्या दोन महिलांचा मृत्यु झाला आहे, त्या दोघीपैकी एकीला नगर जिल्हातील एका शहरात तर एकीला पुणे शहरातील एका खाजगी रु्गनानालयात स्वाइन फ्लुची लागण झालेली आहे. हा रोग संसर्गजन्य असतानाही रुग्नाला भेटायला जाणारे नातेवाईक व अथवा रुग्नांजवळ थांबणारे नातेवाईक पुरेशी काळजी घेत नाहीत हे वास्तव आहे. अशा रुग्नाजवळ थांबणाऱ्यांनी अथवा संबधित रुग्नास भेटायला जाणाऱ्यांनी वैधकिय सल्ल्यानुसार काळजी घेण्याची गरज आहे. तोंडाला मास्क घातल्याशिवाय रुग्नाजवळ जाऊ नये असाही सल्ला संबधित अधिकाऱ्याने दिला.

तालुकानिहाय रुग्णांची यांदी-  हवेली (संशयित- 7, मयत- 2), आंबेगाव (संशयित- 1, मयत- 1), बारामती (संशयित- 3, मयत- 0), दौंड (संशयित - 2, मयत - 0), जुन्नर (संशयित - 1. मयत - 0), खेड (संशयित- 3, मयत - 1), मावळ (संशयित - 3, मयत- 2), मुळशी (संशयित- 1, मयत- 1), पुरंदर (संशयित- 3, मयत - 1), शिरुर (संशयित- 3, मयत- 1) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com