रोखे घोटाळा तीन महिन्यांत निकाली काढा : नागपूर खंडपीठाचे आदेश
रोखे घोटाळा तीन महिन्यांत निकाली काढा : नागपूर खंडपीठाचे आदेश

रोखे घोटाळा तीन महिन्यांत निकाली काढा : नागपूर खंडपीठाचे आदेश

नागपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष आमदार सुनील केदार आणि अन्य आरोपींविरोधातील रोखे घोटाळ्याचा खटला तीन महिन्यांत निकाली काढा, असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाला दिले . 

कोट्यवधी रुपयांच्या रोखे घोटाळ्याची न्यायमूर्ती प्रदीप देशमुख, रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. इतर आरोपींमध्ये बॅंकेचे माजी महाव्यवस्थापक अशोक चौधरी (नागपूर), रोखेदलाल केतन सेठ, सुबोध भंडारी, कानन मेवावाला, नंदकिशोर त्रिवेदी (सर्व मुंबई), अमित वर्मा (अहमदाबाद), महेंद्र अग्रवाल (कोलकात्ता) व बॅंक कर्मचारी सुरेश पेशकर यांचा समावेश आहे. 

याबाबत ओमप्रकाश कामडी व इतरांनी अर्ज दाखल केला आहे. आरोपी रोखे दलाल संजय अग्रवाल वगळता सुनील केदार व इतरांविरोधातील खटला तातडीने निकाली काढण्याचे आदेश उच्च न्यायालयाने २०१४ मध्ये दिला. परंतु, त्या आदेशाचे काटेकोरपालन झाले नाही, असे अर्जदारांनी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे मागील तारखेला न्यायालयाने खटल्याचे रेकॉर्ड सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, बुधवारी (ता. ६) खटल्याचा रेकॉर्ड सादर करण्यात आला. त्यासोबतच मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी हा खटला दोन महिन्यांत निकाली काढण्याचे हमीपत्र दाखल केले. त्यानंतर न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता, हा खटला तीन महिन्यांत निकाली काढण्यास सांगितले. 

संजय अग्रवाल यांच्या एका प्रकरणात मुंबई मुख्यपीठाने १९ डिसेंबर १०१४ रोजी या खटल्यावर स्थगिती दिली होती. त्यामुळे खटला थांबवून ठेवण्यात आला होता. परंतु, नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर अग्रवाल वगळता इतर आरोपींविरोधातील खटला चालविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com