बागलाण तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्षबागांची तहसीलदारांकडून पाहणी

बागलाण तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्षबागांची तहसीलदारांकडून पाहणी
बागलाण तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्षबागांची तहसीलदारांकडून पाहणी

नाशिक : बगलाण तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पूर्व हंगामी द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. येथील करंजाडी व मोसम खोऱ्यातील पिंगळवडे, ताहाराबाद, सोमपूर, दसाने, पारनेर, बीजोटे, करंजाड, डोंगरेज, मुंगसे, टेंभे, लाडुद, जायखेडा, चौगाव आदी परिसरातील द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी पाहणी नुकसान झालेल्या बागांची पाहणी करून त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश दिले. तालुक्यात मोसम खोऱ्यातील पिंगळवडे येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी वेडू जीभाऊ भामरे यांच्या क्लोन जातीचा निर्यातक्षम द्राक्ष बाग जमीनदोस्त झाला. यामध्ये काढणीसाठी आलेला २० टन द्राक्ष माल खराब झाला आहे. आमदार दीपिका चव्हाण व माजी आमदार दिलीप बोरसे या यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. बागलाण तहसीलदार जितेंद्र इंगळे -पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला आहे. गट नंबर २४३-३ येथील भामरे यांचा क्लोन २ जातीचा दोन एकर द्राक्षबाग वादळी वाऱ्याच्या पावसामुळे जमीनदोस्त झाल्याने साधारण १५ लाख रुपयेपर्यंत नुकसान झाले. या वेळी कृषी सहायक ऐ. ऐ .पगार, तलाठी मनोज भामरे यांनी उपस्थित पाच-पंचवीस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमक्ष पंचनामा केला.  बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पूर्वहंगामी द्राक्ष बाग उत्पादन येते. यामुळे परिसराला रोजगार सह आर्थिक स्रोताच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. मात्र, हवामानाचा अंदाज अचूक भेटत नसल्याने बागांचे नियोजन व व्यवस्थापन करताना अडचणी येतात. परिणामी, मोठे नुकसान होते. यामुळे सरकारी यंत्रणा व कृषी विभागाने आमच्या सूचनेची दखल घेऊन अचूक माहिती देणारे हवामान केंद्र स्थापन करावे व वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन करावे, अशी विनंतीवजा सूचना द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी तहसीलदार जितेंद्र इंगळे -पाटील यांच्याकडे केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com