Agriculture news in marathi; Tahsildar inspects damaged vineyards in Baglan taluka | Page 2 ||| Agrowon

बागलाण तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्षबागांची तहसीलदारांकडून पाहणी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

नाशिक : बगलाण तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पूर्व हंगामी द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. येथील करंजाडी व मोसम खोऱ्यातील पिंगळवडे, ताहाराबाद, सोमपूर, दसाने, पारनेर, बीजोटे, करंजाड, डोंगरेज, मुंगसे, टेंभे, लाडुद, जायखेडा, चौगाव आदी परिसरातील द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी पाहणी नुकसान झालेल्या बागांची पाहणी करून त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश दिले.

नाशिक : बगलाण तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पूर्व हंगामी द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. येथील करंजाडी व मोसम खोऱ्यातील पिंगळवडे, ताहाराबाद, सोमपूर, दसाने, पारनेर, बीजोटे, करंजाड, डोंगरेज, मुंगसे, टेंभे, लाडुद, जायखेडा, चौगाव आदी परिसरातील द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी पाहणी नुकसान झालेल्या बागांची पाहणी करून त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश दिले.

तालुक्यात मोसम खोऱ्यातील पिंगळवडे येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी वेडू जीभाऊ भामरे यांच्या क्लोन जातीचा निर्यातक्षम द्राक्ष बाग जमीनदोस्त झाला. यामध्ये काढणीसाठी आलेला २० टन द्राक्ष माल खराब झाला आहे. आमदार दीपिका चव्हाण व माजी आमदार दिलीप बोरसे या यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. बागलाण तहसीलदार जितेंद्र इंगळे -पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला आहे. गट नंबर २४३-३ येथील भामरे यांचा क्लोन २ जातीचा दोन एकर द्राक्षबाग वादळी वाऱ्याच्या पावसामुळे जमीनदोस्त झाल्याने साधारण १५ लाख रुपयेपर्यंत नुकसान झाले. या वेळी कृषी सहायक ऐ. ऐ .पगार, तलाठी मनोज भामरे यांनी उपस्थित पाच-पंचवीस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमक्ष पंचनामा केला. 

बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पूर्वहंगामी द्राक्ष बाग उत्पादन येते. यामुळे परिसराला रोजगार सह आर्थिक स्रोताच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. मात्र, हवामानाचा अंदाज अचूक भेटत नसल्याने बागांचे नियोजन व व्यवस्थापन करताना अडचणी येतात. परिणामी, मोठे नुकसान होते. यामुळे सरकारी यंत्रणा व कृषी विभागाने आमच्या सूचनेची दखल घेऊन अचूक माहिती देणारे हवामान केंद्र स्थापन करावे व वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन करावे, अशी विनंतीवजा सूचना द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी तहसीलदार जितेंद्र इंगळे -पाटील यांच्याकडे केली.


इतर ताज्या घडामोडी
लातूर, उस्मानाबादमध्ये २० तूर खरेदी...लातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात हमी...
शेती करताना जैवविविधता जोपासणे आवश्यक...नाशिक : वाढत्या लोकसंख्येचा भार कृषी क्षेत्रावरही...
अकोला : तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीत...अकोला  ः शासनाकडून हमी भावाने तूर खरेदीसाठी...
भंडारा : शेतकरी किसान सन्मानच्या...भंडारा ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेला वर्षभराचा...
कवठेमहांकाळ तालुक्यात पाणीसाठ्यात वाढसांगली  ः कवठेमहांकाळ तालुक्यात ऑक्टोबर...
खानदेशात कांदा लागवड सुरूचजळगाव ः खानदेशात कांदा लागवड सुरूच असून, सुमारे...
असे करा घाटेअळीचे जैविक व्यवस्थापनघाटेअळी नियंत्रणासाठी सातत्याने रासायनिक...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...