Agriculture news in marathi Taiwan Pink Peru coming at Pune Market Committee | Agrowon

पुणे बाजार समितीत तैवान पिंक पेरूची आवक

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

पुणे : राज्यात सध्या पेरूचा हंगाम सुरू झाला असून, स्थानिक वाणांसह तैवान पिंक पेरूचीदेखील आवक बाजारपेठेत सुरू झाली आहे. गेल्या महिन्यापासून तुरळक होणारी ही आवक आता वाढली असून, दररोज सुमारे ३०० बॉक्स आवक होत आहे.

आकाराने मोठ्या आणि वजनाला सरासरी ५०० ग्रॅम वजन असलेल्या या पेरूला किलोला ५० रुपयांचा दर मिळत असल्याची माहिती अडतदार सचिन भोईबार यांनी दिली. सोमवारी (ता. २५) सुमारे ३०० बॉक्स तैवान पिंक पेरूची आवक झाली होती. 

पुणे : राज्यात सध्या पेरूचा हंगाम सुरू झाला असून, स्थानिक वाणांसह तैवान पिंक पेरूचीदेखील आवक बाजारपेठेत सुरू झाली आहे. गेल्या महिन्यापासून तुरळक होणारी ही आवक आता वाढली असून, दररोज सुमारे ३०० बॉक्स आवक होत आहे.

आकाराने मोठ्या आणि वजनाला सरासरी ५०० ग्रॅम वजन असलेल्या या पेरूला किलोला ५० रुपयांचा दर मिळत असल्याची माहिती अडतदार सचिन भोईबार यांनी दिली. सोमवारी (ता. २५) सुमारे ३०० बॉक्स तैवान पिंक पेरूची आवक झाली होती. 

भोईबार म्हणाले, की बाजारात सध्या पेरूचा हंगाम सुरू झाला असून, पुणे जिल्ह्यातील शिरूर, बारामती, सासवड, पुरंदर भागांतून स्थानिक पेरूची आवक होत आहे. हा पेरू आकाराने मोठा वजनाला किमान ४०० ते ५०० ग्रॅम असून, आतून फिकट गुलाबी आहे. चवीला स्थानिक वाणापेक्षा कमी गोड असतो. ग्राहकांची मानसिकता ही लहान पेरू घेण्याची असल्याने याला विशेष मागणी नसल्याचेही त्यांनी सांगितले.

किरकोळ फिरत्या विक्रेत्यांकडून याला मागणी आहे.  याबाबत शेतकरी तानाजी रासकर (इंदापूर) म्हणाले, की मी तैवान पिंक पेरूच्या ३०० रोपांची लागवड केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पेरूचे उत्पादन सुरू झाले असून, आठवड्याला दोन वेळा काढणी होते. एका तोडणीमध्ये ३० ते ५० बॉक्स माल निघतो. हंगामात पहिल्यांदा ६० रुपये किलो दर मिळाला. आता हा दर ४० ते ५० रुपये मिळत आहे.


इतर बाजारभाव बातम्या
बार्शीत तुरीची आवक वाढलीबार्शी, जि. सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात मेथी २५० ते ३००० रुपये शेकडासोलापुरात प्रतिशेकडा ३०० ते ७०० रुपये सोलापूर...
नाशिक बाजारात कारल्याचे दर टिकूननाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात वांगी, गाजराला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाला आवक घटली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात मका दरात सुधारणाजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
औरंगाबादमध्ये मोसंबीला सर्वसाधारण ३०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कोल्हापूर : गुळाच्या दरात १५० रुपयांनी...कोल्हापूर : बाजार समितीत गेल्या आठ दिवसांमध्ये...
राज्यात बटाटा १००० ते २६०० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला १००० ते १२५० रुपये...
नाशिकमध्ये भेंडीला सर्वसाधारण २९१० रुपयेनाशिक : ‘‘येथील बाजार समितीमध्ये भेंडीची आवक ५२...
नाशिकमध्ये कांद्याच्या दरात सुधारणानाशिक: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नगरमध्ये तूर ४००० ते ५५०० रुपये...नगर ः नगर येथील दादा पाटील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात कांदा दरात सुधारणा सुरूच आहे. दर...
औरंगाबादमध्ये मक्यासह तुरीचे दर स्थिरजालना : येथील बाजार समितीमध्ये गत आठवड्यात ५ ते ९...
पुण्यात भोगीनिमित्त गाजर, मटारला मागणीपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत द्राक्षांना क्विंटलला ६०००...औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ९...
परभणीत शेवग्याला क्विंटलला ५००० ते ८०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
आंबिया संत्र्याला मिळाला २२ हजार...नागपूर : बाजारात संत्र्याचे दर गडगडले असतानाच...
राज्यात कांदा २०० ते ३५०० रुपयेसोलापुरात प्रतिक्विंटला २०० ते ३५०० रुपये...
नाशिकमध्ये दोडक्याची आवक सर्वसाधारण;...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...