agriculture news in marathi - Takari dam release water | Agrowon

ताकारी उपसा सिंचन योजनेतून तिसरे अावर्तन सुरू
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 जून 2018

सांगली ः ताकारी उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी हंगामासाठीचे आवर्तन सुरू केले आहे. यामुळे कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्‍यातील हजारो एकर शेतीला लाभदायी ठरणाऱ्या ताकारी उपसा जलसिंचन योजनेचे तिसरे पाणी आवर्तन सुरू करण्यात आले आहे. दुसरे आवर्तन बंद झाल्यानंतर अवघ्या ११ दिवसांत पाणी सुरू केल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. जूनपासून पावसाळा सुरू होतो. त्यामुळे यंदाच्या हंगामातील ताकारीचे हे शेवटचे पाणी ठरण्याची शक्‍यता आहे. 

सांगली ः ताकारी उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी हंगामासाठीचे आवर्तन सुरू केले आहे. यामुळे कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्‍यातील हजारो एकर शेतीला लाभदायी ठरणाऱ्या ताकारी उपसा जलसिंचन योजनेचे तिसरे पाणी आवर्तन सुरू करण्यात आले आहे. दुसरे आवर्तन बंद झाल्यानंतर अवघ्या ११ दिवसांत पाणी सुरू केल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. जूनपासून पावसाळा सुरू होतो. त्यामुळे यंदाच्या हंगामातील ताकारीचे हे शेवटचे पाणी ठरण्याची शक्‍यता आहे. 

कायम दुष्काळी असणाऱ्या कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्‍यातील बहुतांश गावांना ताकारी योजना संजीवनी ठरली आहे. कार्यक्षेत्रातील साखर कारखान्यांच्या पुढाकाराने सदर योजना मागील १५ वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. लाभक्षेत्रात बागाईतक्षेत्र फुलवणारी ताकारी यंदा अडखळतच तीन महिने उशिरा सुरू झाली. माळरानाच्या पिकांची होरपळ होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

याबाबत शेतकऱ्यांनी किंतू मनात न ठेवता पुनश्‍चः उभारी घेत मळे फुलले आहेत. पाटबंधारेनेही साद देत गरजेनुसार दोन आवर्तनाचे पाणी दिले. या योजनेवरील टप्पा १ साटपेवाडी बंधाऱ्यातील ६ पंप सुरू करण्यात आले. त्यानंतर ७ वाजता टप्पा २ सागरेश्वर संतुलन जलाशयातील ६ पंप सुरू करून पाणी मुख्य कालव्यात सोडले. या पाण्याचा लाभ प्रामुख्याने बारमाही बागाईत पिकांसह आगामी खरीप हंगामाच्या पेरण्यासाठी होणार आहे.

बहुतांश गावांच्या पाणीपुरवठा स्तोत्रापर्यंत ताकारीचे पाणी पोहचते. त्यामुळे पाणीप्रश्न निकालात निघणार आहे. तसेच काही प्रमाणात पाणी येरळा नदीत जाते. परिणामी नदीकाठच्या शेतीला व पाणीपुरवठा योजनांना लाभ होणार आहे. दुसरे आवर्तन संपल्यावर काही दिवसांतच हे पाणी आल्याने भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होईल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.

लाभक्षेत्रातील सर्व क्षेत्राला पाणी दिले जाणार आहे. यासाठी कितीही दिवस अखंडपणे योजना सुरू ठेवण्याची तयारी पाटबंधारेची आहे. शेतकऱ्यांनी निश्‍चिंत राहावे. 
- प्रकाश पाटील, कार्यकारी अभियंता ताकारी योजना.

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...