Agriculture news in marathi 'Takari' rotation will release to Sony | Agrowon

‘‘ताकारी’चे आवर्तन सोनीपर्यंत सोडणार’

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 एप्रिल 2020

सांगली : ‘‘कडेगाव, खानापूर व तासगाव तालुक्याला वरदान ठरणाऱ्या ताकारी उपसा जलसिंचन योजनेचे आर्वतन मुख्य कालव्याच्या १०२ किलोमिटरवर विसापूरपर्यंत पोहचले आहे. हे पाणी कालव्याच्या शेवटी सोनी (ता. मिरज) मधील १४४ किलोमिटरपर्यंत सोडण्यात येईल.

सांगली : ‘‘कडेगाव, खानापूर व तासगाव तालुक्याला वरदान ठरणाऱ्या ताकारी उपसा जलसिंचन योजनेचे आर्वतन मुख्य कालव्याच्या १०२ किलोमिटरवर विसापूरपर्यंत पोहचले आहे. हे पाणी कालव्याच्या शेवटी सोनी (ता. मिरज) मधील १४४ किलोमिटरपर्यंत सोडण्यात येईल,’’ अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांनी दिली. 

यंदा उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यानंतर ७ मार्चपासून दुसरे आवर्तन सुरू करण्यात आले. सुरूवातीला कडेगाव तालुक्यातील कुंभारगाव ते वांगीपर्यंतच्या २२ कि.मी. कालव्यावरील वितरिकांतून शेतीला पाणी देण्यात आले. त्यानंतर १९ मार्चपासून पुढील प्रत्येकी २०-२५ कि. मी.च्या टप्प्यात पाणी सोडले. हे पाणी १५ दिवसांनी २२ एप्रिलला भाळवणी (ता. खानापूर) परिसरात पोहचले होते. आता २३ दिवसांनी तासगाव तालुक्यातील विसापूर येथे पाणी पोहोचले. 

आवर्तन १५ दिवस सुरूच राहणार 

‘ताकारी’मुळे लाभक्षेत्रातील कडेगाव, खानापूर आणि तासगांव तालुक्यातील शेतीला तसेच गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध होते. गळतीचे काही पाणी पोहचल्याने येरळा नदी वाहू लागली आहे. सध्या योजनेचे टप्पा १ आणि टप्पा २ वरील प्रत्येकी ११ पंप सुरू आहेत. मुख्य कालवा तुडूंब भरून वाहत आहे. मात्र, कडक उन्हामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पाणी संथगतीने पुढे सरकत आहे. शिवाय टप्पा ३ व ४ वरील पंप सुरू करून पाणी सोनहिरा खोऱ्या‍तील सर्व गावांना देण्यात आले आहे. मुख्य कालव्यातून हे पाणी १४४ कि.मी. वर मिरज तालुक्यातील सोनीपर्यंत दिले जाईल. त्यामुळे हे आर्वतन अजून किमान १५ दिवस सुरुच राहण्याची शक्यता आहे. 
 


इतर बातम्या
पीककर्ज द्या, वीजबिल माफ करा,...सोलापूर  ः शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रक्रिया...
पुणे बाजार समितीत शेतीमालाची आवक तुरळकचपुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु...
औरंगाबाद जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व कपाशी...औरंगाबाद : जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात...
जालन्यात सव्वा लाख क्विंटलवर कापूस...जालना : जिल्ह्यात कापूस खरेदीची एकूण ८...
नुकसानग्रस्तांना मदतीबाबत योग्य तो...पुणे  ः निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि पुणे...
निसर्ग चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात...पुणे  ः निसर्ग चक्रीवादळ आणि अति पावसाचा...
कोकणात पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रात आलेल्या ‘निसर्ग’...
मंजुर येथील बंधाऱ्याचा भराव पहिल्याच...नगर  ः मंजुर (ता.कोपरगाव) येथील कोल्हापुर...
रविवारपर्यंत मॉन्सूनची आणखी चाल शक्य पुणे: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरूवारी...
निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी...रत्नागिरी  : निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले...
भुईबावडा परिसरातील तीन गावांना ...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील भुईबावडा (ता.वैभववाडी)...
हमीभाव मिळवून देण्यात केंद्र सरकार...पुणे: केंद्र सरकार गाजावाजा करून हमीभाव जाहीर करत...
जत तालुक्‍याच्या पूर्व भागात चारा टंचाईसांगली  ः पावसाने दिलेली दडी, वाया गेलेला...
शेतकरी उत्पादक कंपन्यांचे बियाणे अनुदान...पुणे : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे बियाणे...
कर्नाटकी बेंदुरावर कोरोनाचे सावटकोल्हापूर:  कर्नाटकी बेंदूर उद्या (ता.७)...
अकोल्यात कंटेनमेंट झोन वाढणार नाहीत...अकोला  ः अकोल्यात कोरोना बाधितांची वाढत...
माझा शेतकरी, माझा अभिमान ! ७ ते १३ जून...पुणे : कोरोनाच्या कठिणकाळात जनता घरबंद असताना...
साखर कारखान्यांनी लॉकडाउनमध्ये जमा केली...पुणे: लॉकडाउनमधील विविध अडचणींना तोंड देत...
अटींवरच शेतकऱ्यांना वर्ध्यात कापूस...वर्धा  ः वर्धा जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या...
चंद्रपूर जिल्ह्यात पंधरा हजारांवर ...चंद्रपूर ः शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची हमी राज्य...