Agriculture News in Marathi Takari scheme launched; The drains are dry and cool | Agrowon

ताकारी योजना सुरू;  ओढे-नाले कोरडे ठणठणीत

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 ऑक्टोबर 2021

ताकारी योजना सुरू होऊन मुख्य कालवा भरून वाहत आहे. मात्र, अस्तरीकरणामुळे गळती आणि पाणी मुरण्याचे प्रमाण शून्य झाले असल्याने वांगी (ता. कडेगाव) परिसरातील सर्वच ओढे-नाले कोरडे ठणठणीत पडले आहेत.

वांगी, जि. सांगली : ताकारी योजना सुरू होऊन मुख्य कालवा भरून वाहत आहे. मात्र, अस्तरीकरणामुळे गळती आणि पाणी मुरण्याचे प्रमाण शून्य झाले असल्याने वांगी (ता. कडेगाव) परिसरातील सर्वच ओढे-नाले कोरडे ठणठणीत पडले आहेत. विहिरींच्या पाणीपातळीत किंचितही वाढ होत नाही. या प्रकाराने पाणीटंचाई सतत भासण्याची शक्यता शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

सुमारे २० वर्षांपासून ताकारीच्या पाण्याने जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, पलूस आणि तासगाव तालुक्यांना दर वर्षी दिवाळीपासून सलग सहा महिने भरपूर पाणी पुरवून सुजलाम्‌-सुफलाम्‌ केले आहे. योजनेतून दर दीड महिन्यांनी येणाऱ्या पाण्याबरोबरच लाभक्षेत्रातील सर्वच ओढ्यावरून होणाऱ्या पाण्याच्या गळतीने ओढा काठावरील सर्व विहिरी पुढील महिनाभर जिवंत राहत असत. मात्र पाटबंधारेच्या धोरणानुसार मुख्य कालवा संपूर्ण अस्तरीकरण होत आहे.

सध्या हे काम वांगी परिसरांतील २/३ ओढ्यावर पूर्ण झाल्याने वांगीतील एकाही ओढ्याला सध्या पाणी नाही. परिणामी ओढाकाठावरील सुमारे २०० विहिरी कोरड्या आहेत. ताकारी आवर्तन बंद झाल्यावर पिकांना पाणी कुठले द्यायचे? या चिंतेने सर्व शेतकरी धास्तावले आहेत. उन्हाळभर पिके कशी जगवायची अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. यातून तत्काळ मार्ग निघून ओढापात्रातून पाणी वाहील याची शाश्वती नसल्याने बागाईत क्षेत्र वाळण्याची भीती आहे. अस्तरीकरणापूर्वी यावर तोडगा निघणे अपेक्षित होते. मात्र संभाव्य धोक्याची कल्पना न आल्याने शेतकरी आणि पाटबंधारे विभाग बिनधास्त राहिले.

प्रतिक्रिया
अस्तरीकरणामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण क्षीण झाले असून, ओढापात्रातून पाणी वाहिल्यास त्याचा शेतीला दीर्घकाळ उपयोग होतो. त्या दृष्टीने संबंधित शाखा अभियंत्यांना सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ओढापात्र कोरडे राहणार नाहीत याची काळजी पाटबंधारे विभाग घेईल.
-राजन डवरी, कार्यकारी अभियंता, ताकारी योजना


इतर बातम्या
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
आता तुम्हीच शोधा  कुठला कारखाना कुणी... पुणे : गेल्या पंधरा वर्षांत ६५ सहकारी साखर...
स्वाभिमानी-कारखानदार संघर्ष अटळ;  ‘...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, गुरुदत्त,...
पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू...पुणे : कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून...
सोयीच्या लोकांची प्रकरणे  सोमय्या झाकून...पुणे : राज्यात एकूण ४३ कारखान्यांची विक्री...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
नगर जिल्ह्यात रब्बीची  सहा टक्के पेरणी  नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत रब्बीची ६...
रब्बीत यंदाही राहणार  हरभऱ्याचाच...अकोला : लवकरच रब्बीची लागवड सुरू होत आहे. या...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
धुळे जिल्हा बँकेत तिघे जण बिनविरोधधुळे ः धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेची १७ जागांसाठी...
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ...बुलडाणा : विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील कापूस,...
`तंत्रज्ञान पोहोचविण्यात कृषी...हिंगोली  ः ‘‘कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान...
नांदेड जिल्ह्यात ग्रामबीजोत्पादनात सात...नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सहा हजार ३१...
यवतमाळ :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ...आर्णी, यवतमाळ : परतीच्या पावसाने खरीप पिकांची...