Agriculture news in marathi 'Takari' water will be provided by the Water Sharing Organization | Agrowon

पाणीवाटप संस्थेद्वारे मिळणार ‘ताकारी’चे पाणी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

ताकारी उपसा सिंचन योजनेतील लाभ क्षेत्रातील पाणीवाटप संस्था स्थापन झाल्या आहेत. येत्या काळात या संस्था सुरू होतील. शेतकऱ्यांना वेळेत पाणी मिळेल. संस्थांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्या पिकाला किती पाणी द्यायचे, याची सविस्तर माहिती मिळेल.
- प्रकाश पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी योजना.

सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रासाठी ७८ पाणीवाटप संस्था सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यापैकी ५८ पाणीवाटप संस्था स्थापन झाल्या आहेत. त्यापैकी २८ पाणीवाटप संस्थेच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित पाणीवाटप संस्थांची प्रक्रिया येता महिन्याभरात पूर्ण होऊन संस्थेच्या माध्यमातून लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी देण्यात येईल, अशी माहिती ताकारी उपसा सिंचन योजनेच्या सूत्रांनी दिली.

ताकारी उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात कडेगाव, पलूस, तासगाव, खानापूर आणि वाळवा तालुके आहेत. या प्रकल्पचे क्षेत्र सुमारे २७ हजार ४३० हेक्टर आहे. लाभ क्षेत्रातील शेतीला पाणी देण्यासाठी गेल्या दोन वर्षांपूर्वी पाणीवाटप संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या प्रकल्पात ७२ संस्था स्थापन होतील. त्यापैकी ५८ संस्थांना मंजुरी मिळाली आहे. सध्या २८ संस्थांची निवडणूक प्रक्रिया काही पूर्ण झाली आहे. ३० संस्थांची प्रक्रिया काही दिवसांत पूर्ण केली जाईल. उर्वरित १४ संस्थांची मंजुरी लवकर घेतली जाणार आहे.

ज्या संस्था पूर्ण झाल्या आहेत. त्या संस्थेमार्फत लाभ क्षेत्रातील शेतीला पाणी देण्याचे नियोजन सुरू केले आहे. मुख्य कालव्यातून पाणी देण्याचे काम केवळ पाटबंधारे विभागाकडे राहतील. संस्था सुरू झाल्यानंतर पाणीवाटपाचे काम त्या संस्थांकडे हस्तांतरित केले जाणार आहे. त्यानुसार संस्था पाण्याचे नियोजन करुन शेतकऱ्यांना पाणी देतील. पाण्याचे नियोजन, पाणीपट्टी वसूलीचे काम या संस्थांना करावे लागेल. 

दुरुस्तीच्या कामांबाबत होणार चर्चा 

पोटकालव्यांची दुरुस्ती, गेटची दुरुस्ती यांसह कोणत्या लाभ क्षेत्रात पाणी पोचत नाही. या साऱ्या गोष्टी प्रकल्प आणि संस्था यांच्यात बैठक घेऊन कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे, याची चर्चा केली जाईल. त्यानुसार कामे पूर्ण केली जाणार आहेत. कोणत्या पिकाला किती पाणी द्यायचे. हे त्या संस्थेवर अवलंबून आहे.


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद बाजार समितीत मिरचीची १३०...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
'राज्यातील पोलीस पाटील, ग्रामसेवकांनाही...बुलडाणा : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
उद्धव ठाकरे परिषदेवर जाणार विधानसभेतून...मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव...
मुद्रित माध्यमेच सर्वाधिक विश्‍वसनीय :...नागपूर: कोरोनाविषयी विविध माध्यमे आणि सोशल...
परभणीत पहिल्या दिवशी १७५ किलो...परभणी : कृषी विभागाच्या महाराष्ट्र...
‘कोरोना’च्या सावटातही पैसे काढण्यासाठी...अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात मदत...
पणन हेल्पलाईनला फोन केला.. अन्‌ ढोबळी...पुणे : पणन मंडळाच्या आंतरराज्य शेतमाल वाहतूक...
बीसीजी लस घेतलेल्यांना कोरोनाचा धोका...पुणे : क्षयरोगाचा (ट्यूबरक्यूलोसिस-टीबी) प्रतिबंध...
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या...मुंबई: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
पुणे विभागात यंदा कमी पाणीटंचाईपुणे : मॉन्सून कालावधीतील दमदार पाऊस,...
कृषिरत्न फाउंडेशनची ‘आधारतीर्थ’तील...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या...
पुणे विभागात धान्याचा साडेसतरा हजार...पुणे : ‘‘पुणे विभागाात दोन एप्रिल रोजी...
लॉकडाऊनमुळे कृषी यांत्रिकीकरणाचे ९...पुणे: राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण मोहिमेला...
सांगलीतील नागवेलीच्या पानांना मागणी...सांगली : कोरोना विषाणूमुळे परराज्यातून...
कराडमधील ग्राहकांच्या घरी १४० पेट्या...रत्नागिरी : ऐन हंगामात ‘कोरोना’च्या...
पीकविम्याची रक्कम कर्जखात्यांत जमा करू...अकोला : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर बँकांनी खरीप...
मोफत धान्य देण्यासंदर्भात केंद्राचे...मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या...
‘जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांत ‘सोशल...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
आठवड्याचा अंदाज : ढगाळ हवामानासह...महाराष्ट्रावर हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतके...
आरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...