Agriculture news in marathi Takari's benefit area Start counting by drone | Page 2 ||| Agrowon

‘ताकारी’च्या लाभक्षेत्राची ड्रोनद्वारे मोजणी सुरू

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 जून 2021

ताकारी उपसा सिंचन योजनेच्या क्षेत्रातील लाभ घेणाऱ्या शेतीची ड्रोनद्वारे मोजणी करण्याचे काम पाटबंधारे विभागाने हाती घेतले आहे. आत्तापर्यंत ड्रोनद्वारे खानापूर आणि तासगाव तालुक्यांतील दहा हजार हेक्टरची मोजणी झाली आहे.

सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या क्षेत्रातील लाभ घेणाऱ्या शेतीची ड्रोनद्वारे मोजणी करण्याचे काम पाटबंधारे विभागाने हाती घेतले आहे. आत्तापर्यंत ड्रोनद्वारे खानापूर आणि तासगाव तालुक्यांतील दहा हजार हेक्टरची मोजणी झाली आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभ क्षेत्रातील सिंचन क्षेत्र निश्चित करण्यास मदत होईल, त्यानुसार शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसुलीस मदत होणार आहे. उर्वरित मोजणी जून-जुलैपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.  

 ताकारी उपसा सिंचन योजनेत वाळवा, पलूस, कडेगाव, खानापूर, तासगाव आणि खानापूर तालुक्यांतील ७० गावे समाविष्ट आहे. या ७० गावांतील सिंचन क्षेत्र २७४३० हेक्टर इतके असून, सध्या २५,०८० हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आले असल्याचे पाटबंधारे विभागाचा दावा आहे. गेल्या दोन वर्षांत या योजनेतील सुमारे १३,५०० हजार हेक्टर क्षेत्राला पाणी मिळते. वास्तविक पाहता, योजनेचे एकूण क्षेत्र आणि भिजणारे क्षेत्र याचा ताळमेळ लागणे कठीण आहे. त्यामुळे पाणीपट्टी वसूल करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.

सुरवातील पाटबंधारे विभागात पाटकरी, क्लार्क यांच्या माध्यमातून सिंचन क्षेत्राची मोजणी केली जायची. त्यानुसार त्याची आकारणी केली जायची. परंतु आता ते शक्य नाही. त्यामुळे ताकारी उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात ड्रोनद्वारे मोजणीचे काम हाती घेतले आहे. खानापूर तालुक्यात ४१०२ हेक्टर तर तासगाव तालुक्यात ९०५६ हेक्टर, असे एकूण १३१५८ सिंचन क्षेत्र आहे. त्यापैकी ११४९९ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आहे.

खानापूर आणि तासगाव या दोन तालुक्यांतील दहा हजार हेक्टर क्षेत्राची मोजणी झाली आहे. पीक उभे असले तरच मोजणी करता येते. सध्या शेतात कोणतीही पिके उभी नसल्याने ड्रोनद्वारे मोजणी करता येत नाही. त्यामुळे मोजणी थांबलेली आहे. येत्या जून ते जुलै महिन्यांत पुन्हा वाळवा, पलूस, कडेगाव आणि मिरज तालुक्यातील मोजणीस सुरुवात होईल. त्यावेळी योजनेच्या लाभ क्षेत्रातील निश्चित सिंचन क्षेत्र समजले. त्यानुसार शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल करण्यास सोपे जाईल. संपूर्ण मोजणी झाल्यानंतर त्याची माहिती संगणकावर येणार आहे.

मोबाइल ॲपद्वारे मिळणार माहिती
संपूर्ण मोजणी झाल्यानंतर या योजनेतील सिंचनाखालील क्षेत्र किती आहे हे निश्चित होईल. त्यानुसार ॲप विकसित केले जाणार आहे. हे ॲप दिवाळीनंतर तयार करण्यासाठी पुढाकार घेणार आहे.  या ॲपच्या माध्यमातून आवर्तन, पाणीपट्टीची आकारणी, शेतकऱ्यांनी भरलेले पैसे याची सविस्तर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली जाणार आहे.

प्रतिक्रिया
ताकारी योजनेच्या लाभ क्षेत्रात ड्रोनद्वारे मोजणी सुरू केली असून, आत्तापर्यंत दहा हजार हेक्टरची मोजणी झाली आहे. उर्वरित मोजणी लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे सिंचन क्षेत्र निश्चित होईल. पाणीपट्टी वसुलीस मदत होणार आहे. तसेच मोबाइल ॲप विकसित करून त्या माध्यमातून पाणीपट्टीची आकारणी, पैसे भरल्याची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना मिळेल.
राजन डवरी, कार्यकारी अभियंता, 
ताकारी उपसा सिंचन योजना


इतर ताज्या घडामोडी
राज्यात सरासरीच्या २४ टक्के अधिक पाऊसपुणे ः जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीसदृश्य...
शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार...सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते,...
अकोला झेडपीची सभा ऑनलाइन, तरीही नाश्‍...अकोला ः कोरोनामुळे बहुतांश सभा, बैठका ऑनलाइन होत...
खासगी पदविकाधारक, पशुधन पर्यवेक्षकांचे...मंचर, जि. पुणे : पशुसंवर्धन विभागातील खासगी...
सांगलीत अतिवृष्टीचा १८१ गावांना फटकासांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेली...
पूरग्रस्तांना ठाकरे सरकारने तातडीने मदत...कोल्हापूर : सध्याची पूरस्थिती बिकट आहे,...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार साडेेआठ...नगर : नगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी खरिपात...
ठाकरे, फडणवीस समोरासमोरकोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी...
शिरोळमध्ये मुख्यमंत्र्यांचा फक्त पाच...शिरोळ, जि. कोल्हापूर : पूरस्थितीचा जिल्ह्यात...
पंढरपूरला जिल्हा करावासोलापूर ः गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत...
जल, मृद्‍संधारण कामांवर भर द्यावा ः एस...बुलडाणा : गावाची समृद्धी माती आणि पाणी यावरच...
खासगीकरणाविरोधात वीज कामगारांचा...नागपूर ः वीज उद्योगाच्या खासगीकरणाच्या...
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...