agriculture news in marathi Takaris third water edition will be given from 22nd april | Page 2 ||| Agrowon

‘ताकारी’चे तिसरे आवर्तन २२ एप्रिलपासून मिळणार

ॲग्रोवन वृत्तसेवा
शनिवार, 17 एप्रिल 2021

सांगली : ताकारी उपसा जलसिंचन योजनेचे आत्तापर्यंत दोन आवर्तन पूर्ण झाली आहेत. आता योजनेचे तिसरे पाणीआवर्तन २२ एप्रिलपासून सुरू होत असून, हे आवर्तन १० जूनपर्यंत सुरू ठेवणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.
 

सांगली : ताकारी उपसा जलसिंचन योजनेचे आत्तापर्यंत दोन आवर्तन पूर्ण झाली आहेत. आता योजनेचे तिसरे पाणीआवर्तन २२ एप्रिलपासून सुरू होत असून, हे आवर्तन १० जूनपर्यंत सुरू ठेवणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

या वर्षी ताकारीचे दुसरे आवर्तन २० फेब्रुवारी ते २ एप्रिल, असे सुरू होते. या पाण्याने मुख्य कालव्याच्या सुमारे १४२ किमीपर्यंत लाभक्षेत्राला दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. योजनेचे दोन आवर्तन पूर्ण झाले आहे. त्यामुळे तिसरे आवर्तन पाटबंधारेने पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. योजनेतील किरकोळ तांत्रिक कामासाठी पाच-सहा दिवसांचा अवधी लागतो हे गृहीत धरून २२ला पाणी सोडण्याचे नियोजन झाले आहे.

विशेष म्हणजे या वेळचे पाणी उरलेला संपूर्ण उन्हाळभर म्हणजे १० जूनपर्यंत सुरूच ठेवले जाणार आहे. तसेच पाण्याचा एकूण वापर लक्षात घेता सुरुवातीपासून ११ पंप सुरू केले जातील. प्रत्येक पोटकालव्यांवरील शेवटच्या शेतकऱ्याला मिळेपर्यंत पाणी सुरूच राहणार आहे. शेतकऱ्यांनी आवश्‍यक तितके पाणी जपून वापरावे.

सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा लाभ बारमाही बागाईत क्षेत्रासह वाढलेल्या उन्हाळी पिकांना होणार आहे. शिवाय कडेगाव, खानापूर, पलूस आणि तासगाव तालुक्‍यातील बऱ्याच गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा पाणीप्रश्न मिटणार असल्याने लोकांतून आनंदाचे वातावरण पसरले आहे. 

तलाव भरून देण्याची मागणी
ताकारी योजनेचे दोन आवर्तन झाली. योजनेच्या मुख्य कालव्यासह पोट कालव्याने लाभ क्षेत्रातील सर्व भागात पाणी दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिसाला मिळाला आहे.  मात्र या योजनेच्या लाभ क्षेत्रात असलेले तलाव देखील भरून देणे अपेक्षित होते. म्हणजे तलावात पाणीसाठा झाला असता. तलावात पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांना त्या तलावाच्या माध्यमातून भविष्यात  शेतीसाठी पाणी वापरता आले असते. परंतु पाटबंधारे विभागाने तलाव भरून देण्याबाबत कोणत्याही हालचाली केल्या नाही.


इतर ताज्या घडामोडी
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...
धान चुकाऱ्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक...गोंदिया : गेल्यावर्षी आधारभूत दराने धान विक्री...
सांगलीत खरिपासाठी हवे ३३ हजार ६९०...सांगली  : यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कृषी...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
तुलनेत यंदा दुपटीने गाळपकोल्हापूर : गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, कांदा, फळ...जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीत...
अस्वलाकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी...भंडारा : जंगलालगत असलेल्या शेतीत वन्यप्राण्यांचा...
अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, ‘...मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर...
अति उष्ण, ढगाळ हवामानआठवडा अखेरपर्यंत ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील...
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे...पुणे ः बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड...
नाशिक : माथाडी युनियनकडून ‘काम बंद’नाशिक : राज्य शासनाच्या विविध माथाडी मंडळातील...
पुणे ‘जि.प.’तर्फे कर्मचाऱ्यांना मिळणार...पुणे ः ‘‘जिल्हा परिषदेच्या बक्षिस योजनेतून आता...
‘खरिपात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरा’सातारा : येत्या खरीप हंगामात  सोयाबीनचे...