Agriculture news in Marathi Takari's water reaches Soni-Bhosi Shivar | Agrowon

ताकारीचे पाणी सोनी-भोसे शिवारात पोहोचले 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

सांगली : ताकारी उपसा जलसिंचन योजनेचे सुरू असलेले यंदाचे दुसऱ्या आवर्तनाचे पाणी मुख्य कालव्याच्या १४४ किलोमीटरवर सोनी-भोसे (ता. मिरज) मधील शिवारात पोहोचले आहे. त्याठिकाणी पुरेसा साठा केल्यानंतर सदरचे पाणी कालव्याच्या पाठीमागील भागात शेतकऱ्यांना गरजेनुसार दिले जाणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांनी दिली. 

सांगली : ताकारी उपसा जलसिंचन योजनेचे सुरू असलेले यंदाचे दुसऱ्या आवर्तनाचे पाणी मुख्य कालव्याच्या १४४ किलोमीटरवर सोनी-भोसे (ता. मिरज) मधील शिवारात पोहोचले आहे. त्याठिकाणी पुरेसा साठा केल्यानंतर सदरचे पाणी कालव्याच्या पाठीमागील भागात शेतकऱ्यांना गरजेनुसार दिले जाणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांनी दिली. 

यंदा उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यानंतर ७ मार्चपासून ताकारीचे दुसरे आवर्तन सुरू करण्यात आले होते. प्रथमतः महिन्यापूर्वी कुंभारगांव ते वांगीपर्यंतच्या २२ किलोमीटर कालव्यावरील वितरिकांतून शेतीला पाणी देण्यात आले. त्यानंतर १९ मार्चपासून पुढील प्रत्येकी २०-२५ किलोमीटरच्या टप्प्यात पाणी सोडून हे पाणी १५ दिवसांनी भाळवणी (ता. खानापूर) परिसरात ६५ किलोमीटरवर वितरीत करण्यात आले. तद्नंतर मजल-दरमजल करीत ताकारीच्या पाण्याने काल कालव्याच्या शेवठापर्यंत सोनी (ता. मिरज) येथे पोहोचले आहे. 

ताकारीमुळे कडेगांव, खानापूर, तासगांव आणि मिरज तालुक्यातील लाभक्षेत्रात पुढील महिनाभर कडक उन्हापासून पिकांच्या बचावासाठी आणि पिण्यासाठी मुबलक पाणी झाले आहे. तसेच सदर तालुक्यातील बहुतांश शेतीला तसेच गावांना पिण्याचे पाणी या योजनेमुळे उपलब्ध होते. तसेच झिरपणारे पाणी येरळेत पोहोचल्याने येरळा नदी प्रवाहित झाली आहे. 

सध्या योजनेचे टप्पा १ साटपेवाडी बंधाऱ्यावरील आणि टप्पा २ सागरेश्वरमधील प्रत्येकी ११ पंप सुरू आहेत. त्यामुळे मुख्य कालवा तुडुंब भरून वाहत आहे. मात्र, कडक उन्हाळा, पाण्याचे होणारे बाष्पीभवन, जमिनीत मुरण्याचे अधिक प्रमाण यामुळे पाणी मंदगतीने पुढे सरकत आहे. शिवाय टप्पा ३ व ४ वरील प्रत्येकी दोन पंप सुरू करून पाणी सोनहिरा खोऱ्यातही सुरूच आहे. 

कालपासून काही प्रमाणात पाणी भिकवडी येथून येरळा नदीतही सोडले आहे. येरळेवरील सर्व बंधारे भरून पाणी कृष्णा नदीला पोहोचेपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच उर्वरित कालव्यावरील गरज असणाऱ्या शेतीला आणखी पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांची पाणी मागणी आवश्यक असल्याचे कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांनी सूचित केले आहे. 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...