`पीक कर्जासाठी व्याज घेणाऱ्या बँकांवर कारवाई करा`

बुलडाणा : शासनाने महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर करीत बँकांनी शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज वाटप करावे, व्याज आकारणी न करता पीककर्ज देण्यात यावे, असे आदेश काढले होते.
Take action against banks that charge interest for crop loans
Take action against banks that charge interest for crop loans

बुलडाणा : शासनाने महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर करीत बँकांनी शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज वाटप करावे, व्याज आकारणी न करता पीककर्ज देण्यात यावे, असे आदेश काढले होते. परंतु बँकांनी आदेशाची पायमल्ली करीत शेतकऱ्यांना व्याज भरल्याशिवाय पीककर्ज न देण्याची भूमिका घेतली. असे प्रकार उघड झाल्याने शेतकऱ्यांना आकारलेली रक्कम त्वरित परत करण्यात यावी व शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक, तालुका उपाध्यक्ष गणेश थुट्टे यांनी तहसीलदारांमार्फत शासनाकडे केली. 

याबाबत संघटनेने म्हटले की, हवालदिल शेतकऱ्यांसाठी शासनाने एक एप्रिल २०१५ते ३१मार्च २०१९ या कालावधीमध्ये घेतलेले मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम दोन लाखापर्यंत माफ करण्याचे जाहीर केले.

कर्जमुक्ती योजनेत बसलेल्या शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करुन देण्यात यावे. याबाबत शासन निर्णय काढून राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी पात्र शेतकऱ्यांकडून पीककर्ज, तसेच अल्पमुदत पीककर्जाचे पुनर्गठन/फेरपुनर्रगठन करुन मध्यम मुदत कर्जात रुपांतर केलेल्या खात्यातील थकीत रकमेवर व्याज आकारणी करु नये असे आदेश दिले होते. परंतु असे असताना बँकांनी शेतकऱ्यांना व्याज आकारणी केल्यानंतर पीककर्ज देण्यात आल्याचे समोर आले आहे.

याबाबत चिखली तालुक्यात सेंट्रल बँक आँफ इंडियाच्या गांगलगाव शाखेने भरोसा व इतर गावातील शेतकऱ्यांना व्याज आकारणी केली असल्याचे समोर आले आहे.   इतर बँकांनी असाच प्रकार केला असून अद्यापर्यंत सोयाबीन सोंगणीला आले तरी पीककर्ज मिळाले नसल्याने शेतकरी बँकांकडे चकरा मारत आहेत.

याबाबत शेतकऱ्यांसह चिखली तहसीलदारांची भेट घेऊन त व्याज आकारणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी बँकांकडून मागविण्यात यावी, सक्तीने वसूल केलेली व्याजाची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित परत करण्यात यावी, शासन आदेशाचे पालन न करणाऱ्या बँकांवर कारवाई करावी,अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सुद्धा देण्यात आले आहे.  यावेळी जिल्हाध्यक्ष सरनाईक, तालुका उपाध्यक्ष गणेश थुट्टे, तालुका सरचिटणीस रविराज टाले, ज्ञानेश्वर साबळे, रामदास थुट्टे, शेख अनीस शेख चाँद, सोपान हटकर, विठोबा गवते, दिलीप थुट्टे, मधुकर थुट्टे यांच्यासह शेतकरी उपस्थीत होते.

शेतकरी पीक कर्जासाठी बँकांकडे चकरा मारतो आहे. पेरणी झाली सोयाबीन सोंगणीला सुरुवात होणार आहे. मूग घरात येऊन पडले तरी सुद्धा कर्ज मिळत नसेल व आदेशाची पायमल्ली करुन व्याज भरुन घेतले जात असेल तर बँक व्यवस्थापकांवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा आंदोलन छेडू.  - विनायक सरनाईक, जिल्हाध्यक्ष रयत क्रांती संघटना  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com