उजनीतील बेकायदा प्रवासी बोंटिगवर कारवाई करा

उजनी जलाशयातून करमाळा तालुक्यातील एक बेकायदेशीर प्रवासी बोटिंग वाहतूक करीत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका आहे.
Take action against Bontig, an illegal passenger in Ujjain
Take action against Bontig, an illegal passenger in Ujjain

पुणे : उजनी जलाशयातून करमाळा तालुक्यातील एक बेकायदेशीर प्रवासी बोटिंग वाहतूक करीत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी इंदापूर येथील भीमा उपसा सिंचन उपविभाग क्रमांक दोन कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते राजू शिंगाडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. 

पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात नुकतेच निवेदन दिले आहे. इंदापूर तालुक्याला उजनीची किनारा लाभला आहे. सुशिक्षित बेरोजगारांनी पर्यटन नौकायनासाठी शासनाकडून रीतसर परवानगी घेतली आहे. पोलिस अधिक्षक यांच्याकडून प्रवासी माल वाहतुकीसाठी जलाशयामध्ये नौकानयन बोटिंगसाठी ना हरकत मिळवले. मात्र सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील एका व्यक्तीने शासनाच्या परवानग्या न घेता अवैध प्रवासी वाहतूक सुरू ठेवली आहे. बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करावी; अशी मागणी राजू शिंगाडे, तुकाराम शेळके, संतोष शिंदे, एस. पी. भोसले यांनी दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com