गुणपत्रिकेवर कोविड १९ उल्लेख करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश

कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ असा उल्लेख केलेल्या प्रकरणाची राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी गंभीर दखल घेतली आहे.
dada-bhuse
dada-bhuse

मुंबई: कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ असा उल्लेख केलेल्या प्रकरणाची राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात राज्य शासनाचे कुठलेही आदेश नसताना तसा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश कृषिमंत्री भुसे यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेला दिले आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालकांना व सर्व कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठविलेल्या पत्रात कृषिमंत्र्यांनी म्हटले आहे की, कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ चा उल्लेख शासन आदेश नसतानाही करण्यात आला आहे. असा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्या संबंधितांची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी व त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश या पत्रात दिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com