Agriculture news in Marathi Take advantage of the beekeeping scheme | Agrowon

मधमाशीपालन योजनेचा लाभ घ्या

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 जानेवारी 2021

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशीपालन) कार्यान्वित झाली आहे. यासाठी पात्र व्यक्ती, संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

नांदेड : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशीपालन) कार्यान्वित झाली आहे. यासाठी पात्र व्यक्ती, संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या योजनेत मध उद्योगांचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुंतवणूक, हमी भावाने मध खरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती करणे.

योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता पुढीलप्रमाणे ः वैयक्तीक मधपाळ पात्रता अर्जदार साक्षर असावा. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य, वय १८ वर्षांपेक्षा जास्त, १० दिवस प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. केंद्रचालक प्रगतिशील मधपाळ व्यक्तीची पात्रता किमान दहावी उत्तीर्ण, वय वर्ष २१ पेक्षा जास्त अशा व्यक्तीच्या नावे किमान किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेती जमीन किंवा भाडेतत्वावर घेतलेली शेतजमीन, लाभार्थीकडे मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्रचालक संस्था यांची पात्रतेत संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे अथवा भाडेतत्वावर घेतलेली किमान एक हजार चौरस फूट सुयोग्य इमारत असावी. तसेच एक एकर शेत जमीन स्वमालकीची किंवा भाड्याने घेतलेली असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावीत.  लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करणेसंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील, असे कळविले आहे.


इतर बातम्या
राज्यात ७ कोटी ९७ लाख क्विंटल साखरेचे...नगर ः राज्यात यंदाही उसाचे जोरदार गाळप सुरू आहे....
शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे...पुणे : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतीला...
अवकाळीच्या तडाख्यात शेवग्याचे पुन्हा...नाशिक : गत जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी...
खानदेशात वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे...जळगाव : खानदेशात कृषिपंपांची वीजबिल थकबाकी...
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...नांदेड : जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगाम २०२०-२१...
‘महाखनिज’मध्ये परराज्यांतील वाळूची...परभणी ः ‘‘राज्य शासनाने परराज्यांतून होणाऱ्या...
पुणे बाजार समितीत पायाभूत सुविधा द्या,...पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार विभागातील...
परभणी : संचालक मंडळाच्या निवडणूकीत...परभणी ः परभणी जिल्हा बॅंक संचालक मंडळाच्या...
सातारा जिल्हा बॅंकेसाठी दोन हजारांवर...सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीसह...
‘लम्पी स्कीन’मुळे दूध उत्पादनाला...नगर ः ‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या...
सात वर्षांत हमीभावात ऐतिहासिक वाढ ः...नवी दिल्ली : गेल्या सात वर्षांत केंद्र सरकारने...
राज्यात चार नवे कृषी संशोधन प्रकल्पपुणे : राज्यातील कृषी शिक्षण व संशोधनाला चालना...
वंचित शेतकऱ्यांसाठी राज्यांनी पुढाकार...पुणे : ‘‘आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील...
सोलापुरात शेतकऱ्यांना थेट कर्जवाटप करणारसोलापूर : आर्थिक स्थितीमुळे गेल्या चार-पाच...
राज्यात थंडीत किंचित वाढपुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात आकाश निरभ्र...
पणनची कापूस खरेदी रविवारपासून बंदनागपूर : बाजारात हमीभावापेक्षा कापसाला मिळणारा...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी...सोलापूर : सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या...
रत्नागिरी हापूस पोहोचला लंडनलारत्नागिरी ः लंडनस्थित भोसले एंटरप्रायझेस यूके आणि...
शेतीला दिवसा आठ तास वीजपुरवठा करा :...मुंबई : राज्यात वीजेचे दर कमी करण्याचे व...
रब्बी ज्वारीचा हुरडा वाण विकसितपरभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...