उपासमार होणार नाही याची काळजी घ्या ः पालकमंत्री चव्हाण 

नांदेड ः ‘कोरोना’च्या परिस्थितीमुळे जिल्ह्यासह इतर राज्यातील एकही व्यक्ती, मजूर, हमाल, रोजंदारी कर्मचारी उपाशी राहणार नाही. याची काळजी घ्यावी, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.
Take care not to starve: Guardian Minister Chavan

‘कोरोना’च्या परिस्थितीला मुकाबला करण्यासाठी चालू असलेल्या स्थितीचा आढावा चव्हाण यांनी रविवारी (ता. २९) जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ आदी या वेळी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष सतर्क ठेवून संपर्क करणाऱ्यांची तात्काळ दखल घेण्यात यावी. त्यांना वेळेत मदत करावी. जिल्ह्यात कुठेही रक्तदान करता येईल. यासाठी तालुकास्तरावर रक्तदान करता येईल, असा प्रयत्न करावा. जिल्ह्यातील विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांसाठी चालू असलेल्या मदत केंद्रातील सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com