agriculture news in marathi, Take control of fodder camps strictly: Dr. Deepak Mhasekar | Agrowon

चारा छावण्यांचे नियंत्रण काटेकोरपणे करा : डॉ. दीपक म्हैसेकर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 मे 2019

सोलापूर : जिल्ह्यातील चारा छावण्याचे नियंत्रण काटेकोरपणे करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरुवारी (ता. ९) येथे दिल्या.

दुष्काळी कामाच्या आढाव्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील  बहुद्देशीय सभागृहात ही बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, महापालिका आयुक्त दीपक तावरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उपायुक्त प्रताप जाधव, पुरवठा शाखेच्या उपायुक्त नीलिमा धायगुडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी आदी उपस्थित होते. 

सोलापूर : जिल्ह्यातील चारा छावण्याचे नियंत्रण काटेकोरपणे करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरुवारी (ता. ९) येथे दिल्या.

दुष्काळी कामाच्या आढाव्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील  बहुद्देशीय सभागृहात ही बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, महापालिका आयुक्त दीपक तावरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उपायुक्त प्रताप जाधव, पुरवठा शाखेच्या उपायुक्त नीलिमा धायगुडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी आदी उपस्थित होते. 

डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘‘चारा छावणीतील जनावरांचे लसीकरण करा. लहान जनावरांचे निर्जंतुकीकरण करा. पशुपालक समितीची स्थापना करा, टॅंकर भरून घेण्यासाठीचे स्रोत निश्‍चित करा, टॅंकरची देयके जीपीएसचे लॉगबुक तपासूनच द्यावी, त्याबाबतची आवश्‍यक कागदपत्रे तपासून घ्यावीत, टॅंकरची क्षमता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून खात्री करून घ्यावी. टॅंकरला अजिबात गळती असू नये.’’‘‘नरेगावरील कामावर मजूर येण्यासाठी नियोजन करावे. बंधाऱ्यातील गाळ काढण्याची कामे घ्यावीत. टॅंकर भरण्यासाठीच्या स्रोतांच्या परिसरातील वीजपुरवठ्याचे नियमन करताना उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा केली जावी,’’ अशाही सूचना डॉ. म्हैसेकर यांनी केल्या.  

पाण्यासाठी २४ तासांत टॅंकर 

पाणीटंचाईच्या गावातून मागणी आल्यास चोवीस तासांत टॅंकर दिला जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले. टॅंकर मागणी असलेल्या गावांना उपविभागीय अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांनी संयुक्तपणे भेट द्यावी. मागणीत तथ्य असल्यास तत्काळ टॅंकर द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

छावणीतील जनावरांना टॅंगिंग करा 

छावणी चालक आणि महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना जनावरांच्या बारकोडिंग बाबत प्रशिक्षण द्यावे, अशा सूचना पुरवठा उपायुक्त नीलिमा धायगुडे यांनी दिल्या. त्या म्हणाल्या, ‘‘दुधाळ जनावरांना ई-नाम प्रणालीवर नोंदणी करून घ्यावे. त्याच्या नोंदी ठेवा. प्रत्येक छावणीत पशुपालक समितीची स्थापना करावी. या समितीची बैठक दर आठवड्याला घ्यावी.’’

इतर बातम्या
मराठवाड्यात २७१ मंडळांमध्ये बरसला पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या...अकोला  ः शेगाव येथे नुकत्याच झालेल्या राज्य...
सातारा जिल्ह्यातील चार साखर...सातारा  : गाळप हंगामातील ऊस उत्पादकांची...
‘आदिनाथ'च्या कामगारांचे पगारासाठी ‘...सोलापूर : आदिनाथ साखर कारखान्याकडून ४१ महिने...
उजनी कालवा फुटला, पिके उद्‌ध्वस्तमोहोळ, जि. सोलापूर : उजनी धरणाचा डावा कालवा मोहोळ...
आधुनिक तंत्रांचा वापर करून स्मार्ट शेती...अकोला : ऊतिसंवर्धित हळद रोपांची निर्मिती आणि...
सांगली जिल्ह्यात अजूनही ९१ टॅंकर सुरूचसांगली  ः जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासूनच...
सिंधुदुर्गातील वृद्ध दाम्पत्यावर...सिंधुदुर्ग  ः पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी...
पुणे जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदानपुणे : ‘‘विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात शहरी...
अखेर बगाजी सागर ‘ओव्हर फ्लो’धामणगाव रेल्वे, जि. अमरावती  : अमरावती आणि...
सरकी ढेपेचे दर कडाडल्याने दूध उत्पादक...अकोला : दुधाळ जनावरांना पोषक खाद्य म्हणून खाऊ...
'स्मार्ट' मुख्यालयाला मिळाली नवी जागापुणे :  राज्याच्या स्मार्ट प्रकल्पाच्या...
सोलापूर जिल्ह्यात मका लष्करी अळीने केला...सोलापूर ः दुष्काळातही जेमतेम पाण्यावर यंदा...
लष्करी अळीपासून कपाशीला धोका नाहीः कृषी...पुणे: राज्याच्या कापूस पिकाला अमेरिकन लष्करी...
खानदेशातही कापसावर लष्करी अळीजळगाव  : खान्देशात जळगाव, धुळे जिल्ह्यांतील...
विधानसभेचा बिगुल वाजलामुंबई: चौदाव्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे...
कांदा दरस्थिती आढाव्यासाठी केंद्राचे...नाशिक : कांदा दर, आवक स्थितीचा आढावा...
तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पुणे ः उत्तर, दक्षिण महाराष्ट्रात कमी दाबाचे...
अकोला जिल्ह्यात तीन तालुक्यांत अतिवृष्टीअकोला ः मागील २४ तासांत अकोला जिल्ह्यात दमदार...
डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...