आवारात गर्दी नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करा : पणन संचालक सोनी

बाजार समित्या आवरातील गर्दी नियंत्रणासाठी केलेल्या उपयोजना चांगल्या असून, त्या अधिक प्रभावी करून गर्दी नियंत्रित करण्याच्या सूचना पणन संचालक सतीश सोनी यांनी दिल्या
आवारात गर्दी नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करा : पणन संचालक सोनी
आवारात गर्दी नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करा : पणन संचालक सोनी

पुणे : ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत कोरोना फैलावाची साखळी तोडायची आहे. यासाठी राज्य सरकार कडक अंमलबजावणी करत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये आणि शहरांमधील फळे, भाजीपाला पुरवठा सुरळीत राहण्यासाठी शेतीमाल बाजारपेठ सुरू ठेवल्या असल्या तरी बाजार समित्या आवरातील गर्दी नियंत्रणासाठी केलेल्या उपयोजना चांगल्या असून, त्या अधिक प्रभावी करून गर्दी नियंत्रित करण्याच्या सूचना पणन संचालक सतीश सोनी यांनी दिल्या.  बुधवार (ता.१४)पासून सुरू झालेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्‍वभूमीवर पणन संचालक सोनी यांनी गुरुवारी (ता.१५) पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे, भाजीपाला, भुसार विभागाला भेट देऊन उपाययोजनांची माहिती घेतली. या वेळी बाजार समिती प्रशासक मधुकांत गरड, सहसचिव सतीश कोंडे, सहायक सचिव बाळासाहेब गायकवाड, विभागप्रमुख बाबा बिबवे, दत्ता कळमकर उपस्थित होते.  या वेळी सोनी म्हणाले, ‘‘कोरोना विषाणूच्या फैलावाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. या निर्बंधातून अत्यावश्‍यक सेवेतून बाजार समिती आणि शेतमालाला वगळले असले, तरी बाजार समित्यांमधील गर्दी नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पुणे बाजार समितीने देखील विविध उपाययोजना करत गर्दी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये शेतीमालाचे व्यवहार हे पहाटे तीन ते सात या वेळेतच ठेवले आहेत. हा कालावधी आणखी कमी करण्याच्या सूचना केल्या. पहाटे तीनच्या ऐवजी मुंबई बाजार समितीसारखे रात्री एक वाजता बाजार सुरू करण्याची सूचना केली. तसेच गर्दी नियंत्रणासाठी आणखी कडक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. तसेच फळे, भाजीपाला विभागातील अडत्यांसोबत विविध शेतीमालाच्या दरांबाबत माहिती घेतली.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com