agriculture news in marathi take every steps and precaution regarding crowd maintenance in APMCs | Page 2 ||| Agrowon

आवारात गर्दी नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करा : पणन संचालक सोनी

ॲग्रोवन वृत्तसेवा
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

बाजार समित्या आवरातील गर्दी नियंत्रणासाठी केलेल्या उपयोजना चांगल्या असून, त्या अधिक प्रभावी करून गर्दी नियंत्रित करण्याच्या सूचना पणन संचालक सतीश सोनी यांनी दिल्या

पुणे : ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत कोरोना फैलावाची साखळी तोडायची आहे. यासाठी राज्य सरकार कडक अंमलबजावणी करत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये आणि शहरांमधील फळे, भाजीपाला पुरवठा सुरळीत राहण्यासाठी शेतीमाल बाजारपेठ सुरू ठेवल्या असल्या तरी बाजार समित्या आवरातील गर्दी नियंत्रणासाठी केलेल्या उपयोजना चांगल्या असून, त्या अधिक प्रभावी करून गर्दी नियंत्रित करण्याच्या सूचना पणन संचालक सतीश सोनी यांनी दिल्या. 

बुधवार (ता.१४)पासून सुरू झालेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्‍वभूमीवर पणन संचालक सोनी यांनी गुरुवारी (ता.१५) पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे, भाजीपाला, भुसार विभागाला भेट देऊन उपाययोजनांची माहिती घेतली. या वेळी बाजार समिती प्रशासक मधुकांत गरड, सहसचिव सतीश कोंडे, सहायक सचिव बाळासाहेब गायकवाड, विभागप्रमुख बाबा बिबवे, दत्ता कळमकर उपस्थित होते. 

या वेळी सोनी म्हणाले, ‘‘कोरोना विषाणूच्या फैलावाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. या निर्बंधातून अत्यावश्‍यक सेवेतून बाजार समिती आणि शेतमालाला वगळले असले, तरी बाजार समित्यांमधील गर्दी नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पुणे बाजार समितीने देखील विविध उपाययोजना करत गर्दी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये शेतीमालाचे व्यवहार हे पहाटे तीन ते सात या वेळेतच ठेवले आहेत. हा कालावधी आणखी कमी करण्याच्या सूचना केल्या. पहाटे तीनच्या ऐवजी मुंबई बाजार समितीसारखे रात्री एक वाजता बाजार सुरू करण्याची सूचना केली. तसेच गर्दी नियंत्रणासाठी आणखी कडक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. तसेच फळे, भाजीपाला विभागातील अडत्यांसोबत विविध शेतीमालाच्या दरांबाबत माहिती घेतली.’’


इतर अॅग्रो विशेष
कृषी सेवा केंद्रचालक, कर्मचाऱ्यांना लस...पुणे ः राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो टन कलिंगडे...सिंधुदुर्गनगरी : कोरोना निर्बंधामुळे जिल्ह्यातील...
खानदेशात केळीची कमी दरात खरेदी जळगाव ः खानदेशात नवती केळी बागांची काढणी सुरू...
निर्यातीच्या केळीला १३०० रुपये दर जळगाव ः खानदेशातून आखातात किंवा परदेशात केळी...
शेतीशाळांची ‘एसओपी’ निश्‍चित पुणे ः शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या शेतीशाळांसाठी...
भुईमूग खर्चालाही महागअकोला ः उन्हाळी हंगामात यंदा लागवड केलेल्या...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
जोरदार पावसाची शक्यता पुणे : मराठवाडा ते मध्य प्रदेशचा मध्य भाग या...
बाजार समित्याबंदमुळे खरीप नियोजन ‘...पुणे: कोरोना नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन...
शेततळे अनुदानाचे वीस कोटी वितरित नगर ः राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या ‘मागेल...
साखर कारखान्यांकडून ९२ टक्के ‘एफआरपी’...कोल्हापूर : राज्यात एप्रिलअखेर एकूण रकमेच्या ९२...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत पुणे : राज्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडत...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
मॉन्सून यंदा वेळेवर पुणे : सध्या मॉन्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक...
शेतकऱ्यांकडे २९ लाख क्विंटल घरचे बियाणे पुणे ः कृषी विभागाने ग्रामबिजोत्पादन मोहिमेतून...
मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी पुणे : मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत...
पावसाचा प्रभाव वाढणार पुणे : कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्रीय वाऱ्याची...
राज्यातील पाणीसाठा ४४ टक्क्यांवर पुणे ः राज्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका वाढला...