agriculture news in marathi, Take immediate action against the drought: Guardian Minister, Patil | Agrowon

दुष्काळनिधीची कार्यवाही तत्काळ करा : पालकमंत्री पाटील
टीम अॅग्रोवन
रविवार, 19 मे 2019

जळगाव : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (ता.१८) जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संवाद साधून टंचाईस्थितीची माहिती घेतली. पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर जिल्ह्यात प्रथमच हजेरी लावली. दुष्काळनिधी व इतर उपाययोजनांबाबत तत्काळ कार्यवाहीचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. चाळीसगाव, पारोळा, अमळनेर तालुक्‍यात शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांनी दुष्काळी स्थितीची माहिती घेतली. 

जळगाव : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (ता.१८) जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संवाद साधून टंचाईस्थितीची माहिती घेतली. पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर जिल्ह्यात प्रथमच हजेरी लावली. दुष्काळनिधी व इतर उपाययोजनांबाबत तत्काळ कार्यवाहीचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. चाळीसगाव, पारोळा, अमळनेर तालुक्‍यात शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांनी दुष्काळी स्थितीची माहिती घेतली. 

जिल्ह्यातील दुष्काळ गंभीर आहे. तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्याचा सामाजिक कार्यकर्ते, सरपंचांचा आरोप आहे. पाटील हे फक्त नावालाच पालकमंत्री असल्याची टीका अनेक लोकप्रतिनिधींनी केली. अखेर जिल्ह्यात दाखल झालेल्या पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचा धावता आढावा घेतला.

सकाळी सात वाजता पाटील चाळीसगावात दाखल झाले. शासकीय विश्रामगृहात दुष्काळीस्थितीसंबंधी प्रशासन व इतर तज्ज्ञांकडून त्यांनी प्राथमिक माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी हिरापूर, वाघळी (ता. चाळीसगाव), तरवाडे खुर्द, मोहाडी (ता. पारोळा) येथे टंचाई परिस्थितीचा आढावा घेतला. अमळनेर तालुक्‍यातील मंगरूळ, अनोरे (ता. अमळनेर) येथे त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. आर्डी येथील गाळमुक्त धरण कामाची पाहणी पालकमंत्र्यांनी केली. तसेच ढेकूसिम (ता. अमळनेर) येथील टंचाई परिस्थितीचा आढावा घेतला. 

पाटील यांनी हिरापूर, वाघळी येथे थेट शेतात जाऊन पाहणीदेखील केली. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी दुष्काळनिधी व टंचाईच्या तक्रारी केल्या. पाटील यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली आणि तत्काळ कार्यवाही करा, टंचाई दूर करण्यासाठी टॅंकरचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावा, जलयुक्त शिवार अभियानातील कामे शक्‍य तेवढ्या लवकर पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

इतर बातम्या
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
राज्य बॅंकेच्या दारात जिल्हा बॅंकांचे...सोलापूर : राज्यात १९७२ ची आठवण करून देणारा भयावह...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...पुणे  : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य...
पूर संकटाचा नव्याने अभ्यास पुणे  : कृष्णा व भीमा खोऱ्यात यंदा आलेल्या...
शेतजमीन मोजणीचा गोंधळ सुरूचपुणे : ड्रोनच्या माध्यमातून गावांचे डिजिटल नकाशे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापराने शेतकरी...नागपूर ः ‘संकरित बियाण्यांचा करा पेरा, लक्ष्मी...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्य बॅंक प्रकरणात मोहिते पाटील, सोपलसोलापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
विश्वी येथे शेतीशाळेत मिळताहेत...बुलडाणा ः मेहकर तालुक्यातील विश्वी येथे शेतीशाळा...