agriculture news in Marathi take immediate action on farmers complaint Maharashtra | Agrowon

बियाणे संबंधित तक्रारींचा तत्काळ निवाडा करावा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 जुलै 2020

निकृष्ट बियाण्यासंबंधी तक्रारी आल्यानंतर बियाणे कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने तक्रार निवारणासाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.

नाशिक: निकृष्ट बियाण्यासंबंधी तक्रारी आल्यानंतर बियाणे कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने तक्रार निवारणासाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. प्राप्त तक्रारींचा कृषी विभागाने तात्काळ निवाडा करावा, अशा सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी कृषी विभागाला दिल्या. 

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सटाणा, देवळा व कळवण तालुक्यात रविवारी (ता.१२) शेतकरी संवाद दौरा आयोजित करण्यात आला होता. यानंतर सटाणा येथे पदाधिकारी व कृषी विभागाच्या बैठकीत कृषिमंत्री बोलत होते. कृषिमंत्री भुसे म्हणाले ‘‘महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेच्या अनुषंगाने ८७० कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहे.

याच निधीतून शेतकऱ्यांना पीक कर्जाचा पुरवठा करण्याचे निर्देशही जिल्हा बँकांना देण्यात आले आहेत. अर्ली द्राक्ष निर्यात धोरणाबद्दल पुढील आठवड्यात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.’’ कृषिमंत्र्यांनी अंबासन येथील जगदीश सावंत यांच्या सीताफळ बागेला भेट दिली. त्यानंतर टेंभे येथील पॅकहाऊस व ओम हायटेक नर्सरीची पाहणी केली.

खतांचा साठा करू नका
राज्यात कुठेही खतांची कमतरता भासणार नाही. कोरोनाच्या संकटामुळे वितरण व्यवस्थेमध्ये थोडी फार तफावत होईल परंतु एकही शेतकरी खते व बियाण्यापासून वंचित राहणार नाही. कुणी चढ्या दराने विक्री करत असेल त्यावर कडक कारवाई करण्यात येईल. राज्यासाठी ५० हजार टन खताचा बफर स्टॉक कृषी विभागाकडे असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विनाकारण खताचा साठा करू नये, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले.


इतर अॅग्रो विशेष
नाशिक विभागात चाळीस लाख टन कापसाची खरेदीनगर ः नाशिक विभागात यंदा १ लाख ३७ हजार ३४५...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कोरोनास्थितीमुळे पोल्ट्री उद्योगाची...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत...
राज्यातील रेशीम कोष उत्पादकांना मिळणार...पुणे ः बदलत्या हवामानामुळे अडचणीत येत...
मका उत्पादकांचे लक्ष शासनाच्या...औरंगाबाद: हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदी बंद...
लाल भेंडीसाठी शेतकऱ्याला केंद्राचे...सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला)...
‘भीमाघोड’ने उभारली सर्वांत मोठी कांदा...पुणे: भीमाघोड शेतकरी उत्पादक कंपनीने महाओनियन...
पावसाचा जोर आजपासून वाढणारपुणे ः उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व...
कापसाचे ६१४ कोटी थकीतनागपूर : राज्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसाची...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
बदलत्या व्यापार समिकरणांचा अन्वयार्थशेती क्षेत्रात नुकत्याच आम्ही काही सुधारणा केल्या...
शरद जोशींचे शिक्षण स्वातंत्र्यशरद जोशींचे तत्वज्ञान एका शब्दात सांगायचे म्हटले...
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...