agriculture news in Marathi take initiative like shri seami samarth companey Maharashtra | Agrowon

श्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनीप्रमाणे पुढाकार घ्या : पंतप्रधान मोदी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

आठवडे बाजारात थेट विक्रीच्या माध्यमातून शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळवून देण्यासाठी पुण्यातील श्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनीने पुढाकार घेतला आहे.

पुणे ः आठवडे बाजारात थेट विक्रीच्या माध्यमातून शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळवून देण्यासाठी पुण्यातील श्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनीने पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या काळातही या कंपनीने पुण्यातील ग्राहकांना घरोघरी भाजीपाला पुरवठा करण्याची साखळी तयार केली होती. या कार्याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात या कंपनीचा उल्लेख करून शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.

पुणे, मुंबईमध्ये शेतमाल विक्रीसाठी सुरू करण्यात आलेल्या आठवडे बाजारात शेतकरी थेट शेतमालाची विक्री करत आहेत. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत असून ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध होत असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पुण्यातील श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी ‘शेतकरी आठवडी बाजार’ ही संकल्पना पुणे व मुंबई शहरात सहा वर्षांपासून राबवत आहेत. जवळपास ४,५०० शेतकरी व ७५० तरुण मिळून वार्षिक १०० कोटी रुपयांचा ताजा, स्वच्छ व निवडक शेतमाल थेट ग्राहकांना रास्त किमतीत विकत आहेत.

शहरातील नागरिकांकडून या शेतकरी आठवडी बाजारास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाच्या परिस्थितीतही कंपनीने योग्य ती काळजी घेऊन शेतकरी गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतमालाच्या विक्रीचे नियोजन पार पाडले. शेतकऱ्यांना उत्पादनाचा योग्य भाव मिळण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात सुशिक्षित ग्रामीण युवकांना व महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अत्यंत काटेकोर व्यवस्थापनातून शेतकरी आठवडी बाजाराच्या यंत्रणा उभ्या केल्या आहेत. ग्रामीण भागात संकलन प्रतवारी केंद्रे उभी करणे, शेतकऱ्यांच्या स्वतःच्या वाहतूक व्यवस्था उभ्या करणे, आधुनिक तसेच ग्राहकभिमुख पॅकेजिंग व हाताळणी व्यवस्था, बाजार ठिकाण स्वच्छता व टापटीपणा, शेतकरी आठवडी बाजारांच्या जागांचे व्यवस्थापन, मागणी पुरवठा योग्य समतोल धोरण त्यामुळे शेतमालाच्या नासाडीवर नियंत्रण, कायदेशीर बाबींची पूर्तता इत्यादी बाबी शेतकरी उत्पादन कंपन्या स्वतःच्या यंत्रणे मार्फत राबवते.

‘‘शेतमालाच्या दरातील स्थिरता व एकसूत्रीपणा, अजून नमूद करण्यासारखे म्हणजे कचरा व्यवस्थापन, थोडक्यात सेंद्रिय तसेच नैसर्गिक शेती पद्धती राबवण्यासाठी बाजारातील ओल्या कचऱ्याचा वापर केला जातो. अशा विविध प्रकारे शासकीय यंत्रणेवर येणारा ताण कमी केला जातो. थोडक्यात शेतकरी कंपन्यांनी नियमावली बनवून शिस्तबद्ध तसेच शेतकरी ग्राहक हित जपणाऱ्या तसेच शासनाला अपेक्षित असलेली शेतकरी आठवडी बाजाराची कार्यपद्धती उभारली आहे,’’ अशी माहिती श्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनीचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांनी दिली.  

प्रतिक्रिया
शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अत्यंत काटेकोर व्यवस्थापनातून शिस्तबद्ध तसेच शेतकरी, ग्राहक हित जपणाऱ्या तसेच शासनाला अपेक्षित शेतकरी आठवडी बाजाराच्या यंत्रणा उभ्या केल्या आहेत. 
- नरेंद्र पवार, श्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनी


इतर अॅग्रो विशेष
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
बिस्कीट निर्मितीतून महिलांनी घेतली...सांगली जिल्ह्यातील नवेखेड (ता.वाळवा) येथील...
शेतीला मिळाली प्रक्रिया उद्योगाची जोडखोपी (ता.भोर,जि.पुणे) येथील अंजना नारायण जगताप...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...
कृषी सुपर मार्केट ः संकल्पना आणि संधीजागतिकीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेती हा एक आर्थिक...
बदल हवेत दिलासादायकहवामान आधारीत फळपीक विमा योजनेत केळी पिकासाठी...
नैसर्गिक आपत्तीत पीकच नाई, तर बापही...यवतमाळः नैसर्गिक आपत्तीत आमी पीकच नाई, त आमचा...
राज्यात गाईच्या दूध खरेदी दरात कपात नगर ः लॉकडाऊन उघडल्यानंतर दुधाची मागणी वाढल्यावर...
कोरडवाहू, बागायतीसाठी हेक्टरी १० हजार...मुंबई: अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे...
थकबाकीदार ७१ कारखान्यांचे गाळप परवाने ‘...पुणे: राज्यात चालू हंगामात ऊस गाळपासाठी अर्ज...
शेडनेट, फळबागेतून मिळालेल्या ओळखीसह...धुळे जिल्ह्यातील फागणे (ता. धुळे) येथील उमेश व...
कष्ट, नियोजनपूर्वक उभारली आंबा, नारळ,...शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करताना वरवडे (ता. जि...