Take measures against lumpy skin disease: MP Patil
Take measures against lumpy skin disease: MP Patil

लंम्पी त्वचा आजाराबाबत उपाययोजना करा : खासदार पाटील

हिंगोली : ‘‘लंम्पी त्वचा आजाराचा संसर्ग झालेल्या गाय आणि बैलांवर उपचार करुन संसर्ग रोखण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाने तत्काळ उपाययोजना आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी’’, असे निर्देश खासदार हेमंत पाटील यांनी दिले.

हिंगोली : ‘‘लंम्पी त्वचा आजाराचा संसर्ग झालेल्या गाय आणि बैलांवर उपचार करुन संसर्ग रोखण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाने तत्काळ उपाययोजना आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी’’, असे निर्देश खासदार हेमंत पाटील यांनी दिले. 

पाटील म्हणाले, ‘‘ हिंगोली, सेनगाव , कळमनुरी, वसमत, औंढा नागनाखथ, नांदेड जिल्ह्यातील किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर, उमरखेड, महागाव या तालुक्यात मोठ्या प्रमाणात जनावरांना लंम्पी त्वचा आजाराचा संसर्ग झाला आहे. प्रामुख्याने गाय आणि बैलांना याचा संसर्ग होत आहे. या आजारात जनावरांना ताप येतो. डोळ्यातून तसेच नाकातून पाण्याचा स्राव येणे, भूक मंदावणे आदी लक्षणे दिसतात. नंतर डोके, मान, पाय, पाठ आदी ठिकाणी दोन ते पाच सेंटिमीटर व्यासाच्या गाठी येतात. त्यातून पू येऊ शकतो.’’ 

जिल्हा पशुसंवर्धन विभागाने आजारावर तात्काळ उपाययोजना कराव्या. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता जनावरांना तत्काळ जवळील पशु दवाखान्यात उपचारासाठी न्यावे. आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्याने पशुपालक हैराण आहेत. आजाराचा प्रसार डास, माश्या, गोचीड आदीतर्फे होतो.

उष्ण व आर्द्र हवामानात याचा जास्त प्रसार होतो. ५ ते ७ दिवसांच्या नियमित योग्य उपचाराने हा आजार पूर्णपणे बरा होतो. सर्व उपचार पशुवैद्यकांच्या सल्यानेच करावेत. जनावरांचा गोठा कोरडा आणि स्वच्छ ठेवा, गोठ्याशेजारी पाणी, शेण, मूत्र जमा होऊन चिखल होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com