पेरणी क्षेत्राची नोंद काळजीपूर्वक घ्या ः डॉ. मोटे

औरंगाबाद : ‘‘रब्बी आणि उन्हाळी हंगामात पेरणी झालेल्या आणि यापुढे होत असलेल्या पेरणी क्षेत्राची नोंद काळजीपूर्वक घेणे गरजेचे आहे, अशा सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी केली.
 Take note of the sowing area carefully: Dr. Mote
Take note of the sowing area carefully: Dr. Mote

औरंगाबाद : ‘‘रब्बी आणि उन्हाळी हंगामात पेरणी झालेल्या आणि यापुढे होत असलेल्या पेरणी क्षेत्राची नोंद काळजीपूर्वक घेणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे, याची अचूक माहिती जिल्हास्तरावर उपलब्ध होईल. याचबरोबर जिल्ह्यात काही मंडळे ही विशेष पिके घेऊन वैशिष्ट्ये जपत आहेत. अशा क्षेत्राची पेरणी नोंद काळजीपूर्वक घ्यावी, अशा सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी केली.

औरंगाबाद जिल्ह्याचे नवीन वर्षातील जानेवारी महिन्याचे  जिल्हा मासिक चर्चासत्र ऑनलाइन माध्यमातून बुधवारी (ता.१२)झाले. त्यावेळी ते बोलत होते. चर्चासत्रात विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. एस. बी. पवार यांनी केले. डॉ. एम. बी. पाटील,  डॉ. गजेंद्र जगताप, डॉ. किशोर झाडे, डॉ. नितीन पतंगे आणि कृषी विज्ञान केंद्रातील विविध विषयाचे विशेषज्ञ यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. मोटे म्हणाले, ‘‘कृषी शास्रज्ञानी केलेले मार्गदर्शन क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना अवगत करा. त्यातून ते थेट शेतकऱ्यांना पोहच होण्यास मदत होईल.’’ डॉ. पवार म्हणाले, ‘‘जिल्ह्यात पाणीसाठे चांगले झाले आहेत. त्यामुळे बागायती क्षेत्र वाढल्याने शेतकरी रब्बी व उन्हाळी पिके घेत आहेत. या सर्व पिकावरील समस्या समजल्या की शास्रज्ञ त्यावर योग्य ते निदान करत उपाय सुचवतील. त्यामुळे पिकाचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी फायदा होईल. पिकाची अवस्था आणि त्यावर येणाऱ्या किडी व रोग याचे वेळीच नियंत्रण केले, तर निश्चितपणे याचा उपयोग उत्पादन वाढीसाठी होईल.’’

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘ऐन मोसंबी बागा ताणावर असताना हवामानात बदल होत आहे. यामुळे आंबे बहर धरणाऱ्या शेतकऱ्यांना काळजी वाटणे साहजिक आहे. शास्त्रोक्त पद्धतीने काळजी घेतली तर मोसंबी फळे आपण पदरात पाडू शकतो. बहर चांगला येण्यासाठी थंडीचा कालावधी हा निदान दोन तीन आठवडे समान असला पाहिजे.’’

डॉ. पतंगे म्हणाले, ‘‘सध्यस्थितीत कापूस हंगाम संपताच पऱ्हाटी उभी ठेऊ नये.’’ डॉ. झाडे म्हणाले, ‘‘कृषी विज्ञान केंद्राद्वारे ऊस पाचट आच्छादन या विषयावर मोहीम घेणार आहोत. त्यासाठी सर्व प्रकारचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देण्यात येईल.’’   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com